चोवीस दिवसापासून सतत पाणी बळीराजा त्रस्त , शासन करते सुस्त नुकसानीची मागणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

गेल्या बावीस दिवसापासून राळेगाव शहरासह तालुक्यामध्ये मध्ये दररोज पाऊस पडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले असून शेतकऱ्यांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी भरीव मदत द्यावी तसेच सरसकट पिक विमा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेतllll गेल्या चोवीस दिवसापासून राळेगाव शहर तसेच तालुक्यामध्ये सतत पाऊस पडत असल्याने शेतीतील सर्व कामे ठप्प आहेत शेतीतील निंदन डवरणे फवारणी करणे खत देणे तन नाशक फवारणी करणे आदी काम बंद आहेत शेतात चालणे मुश्किल झाले आहेत ज्या शेतकऱ्यांची जमीन नाल्याला लागून आहेत त्यांच्या समस्यांना तर पारावरच नाही नाल्याला लागून असलेली शहरातील मेंगापूर रस्त्याकडील जवळपास हजार हेक्टर जमीन पडीत पडली आहेत अशापैकी काही शेतकऱ्यांचे घरी नेलेले बियाणे अजून घरीच आहेत काहींनी शेतात डोबले ते निघालेच नाही काहींनी बियाणे टाकले ते तसेच सडले शेतातील तुरी भाजून गेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वळानसार आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतातील काही कामे होत आहेत इतर शेतकऱ्यांच्या शेतात मात्र कपाशी हितभर व तन टोंगळभर अशी स्थिती आहेत दररोज इतका मुसळधार पाऊस होत आहे की शेत जलमय झाले आहेत शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहेत नाल्याकाटच्या शेतांच्या बांद्या सुद्धा ठल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी शेतात खर्च केला त्या शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघणे कठीण आहे अशा स्थितीमध्ये मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे शेतकऱ्याला हेक्टरी दोन चार पाच नाही तर जवळपास 20 हजार रुपये मदत द्यायला हवी याशिवाय शेतकऱ्यांना सरसकट पिक विम्याची मदत सुद्धा द्यावयास हवे शेतकरी अडचणीत असताना यावेळेस सरकारने जर शेतकऱ्यांना भरीव मदत केले नाही पिक विम्याची रक्कम दिली नाही तर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शेतकरी आपली नाराजी मतपेटीत दाखवू शकते एवढे निश्चित