
सहसंपादक: रामभाऊ भोयर
विदर्भात यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख आहे याचं जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घेतले जाते याच पांढऱ्या सोन्या पाठोपाठ नगदी पीक म्हणून सोयाबीनचे पीक घेतले जाते मात्र या नगदी पिकाच्या भावात मोठी घसरण झाली असून सरत्या वर्षात ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांवर भाव स्थिरावले असून या नवीन वर्षात तरी सोयाबीनची भाव वाढ होईल होईल का ही अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.
सोयाबीन पिकांच्या दरात भाव वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरीच सोयाबीन साठवूनुक करून ठेवली आहे. तालुक्यात ५ हजार हेक्टर वर सोयाबीनचा पेरा असून उत्पादनही नगण्यच होत असतांना सुद्धा मागील वर्षीपासून सोयाबीन च्या दरात मोठी घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षीपासून सोयाबीन साठवून ठेवले असून या नवीन वर्षात तरी सोयाबीनचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीवर सोयाबीनचे दर ठरतात त्यामुळे नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावे.
