बरडगाव फाटा येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

सहसंपादक: रामभाऊ भोयर

अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बरडगांव फाटा येथे दिं २७ मार्च २०२४ च्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हा मृतदेह अनोळखी असून पुरूष वय ३२ वर्षे रंग काळा, अंगात फिकट आकाशी रंगांचे फुल बायचे शर्ट, हिरवट रंगाचे फुल पॅन्ट घातलेला, बांधा- मजबूत उंची ५ फूट अशा वर्णाचे इसम मृत अवस्थेत मिळून आला आहे .सदर फिर्यादीच्या सांगण्यावरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात अंमलदार रत्नपाल मोहाडे करीत आहे तर सदर वर्णाचा इसम आपले गावांतील असल्यास पोलीस स्टेशन राळेगाव येथे या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा ९५५२५५०३५० पोलीस अंमलदार मोहाडे पो स्टे राळेगाव.