ढाणकी शहरातील पथदिवे बंद होण्याचे नाव घेत नाही बंद होण्याचे ठिकाण विदेशात आहे का?


प्रतिनिधी : प्रवीण जोशी
ढाणकी


शहरातील पथदिव्याची दिवसा लख्ख उजेड पाडण्याची प्रथा आणि परंपरा कायमच दिसून येत आहे. याबाबत वृत्तलेपर्यंत शहरातील पथदिवे चालूच होते यामुळे संबंधित पथदिवे राबविणारी यंत्रणा किती मजूर उठोळ आहे हे लक्षात येते व” तू कर वटवट मी अहो बळकट” या बाबीची सुद्धा जाण होते शासकीय कोणत्याही कार्यालयात गेली की सर्वसामान्यावर नियमाची सरबत्ती केल्या जाते कर भरणा करावयास गेल्यास नगरपंचायत अनेक कर लावत असते. त्याचा भार सर्वसामान्य जनतेवर पडत असतो तसेच ढाणकी शहरातील पथदिवे बंद करण्याची व्यवस्था ही विदेशात आहे की काय किंवा हा खूप मोठा गंभीर प्रश्न असून याचा या बाबीशी निगडी जाणकार शहरात उपलब्ध नसून एखादा पथदिवे बंद करणारा संशोधकच आणावा लागेल की काय असा प्रश्न सर्वसामान्य शहरवासीयांना पडत आहे व यामुळे देशाची संपत्ती राष्ट्राची संपत्ती म्हणून नेहमीच विद्युत बाबत वल्गना केली जाते मग याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन का बाजारातील कर वसुलीची तत्परता इथं नगरपंचायत प्रशासन दाखवेल का हा प्रश्न शहरवासीयांना पडतो आहे त्यामुळे कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही असे म्हणायचे का, तसेच भारतीय जवान हे अहोरात्र देशाची सेवा करण्यास तत्पर असतात आणि त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत प्रत्येक जण सीमेवर जाऊ शकत नाही पण विद्युत स्वरूपात होणारी हाळी टाळल्यास नक्कीच आपण देशाच्या प्रगतीमध्ये थोडाफार हातभार लावल्यासारखी होईल. अशा अनाठाई विद्युत वापरामुळे नक्कीच कुठेतरी राष्ट्राची हानी होत आहे त्यामुळे आत्मचिंतनाची गरज भासते