अवैद्य रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त, कर्तव्यदक्ष नायब् तहसीलदार बदकी यांची कारवाई

प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

तालुक्यात रेती तस्कतिने डोके वर काढ ल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. महसूल प्रशासनाच्या कारवाह्यांना न जुमानता दिवसे न दिवस अवैध रेती तस्करि वाढत आहे. आज दि.12 आगस्ट 2021 दुपाच्या वेळेस वालदुर रेती घाटावर रेती नेण्या करिता आलेला ट्रॅक्टर महसूल विगाचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार दिलीप बदकी यांनी महसूल कर्मचाऱ्या सह ट्रॅक्टर जप्त करून त्यावर कारवाही केली .रामगंगा नदीचा प्रवाह सावंगी मार्गे वाल दूर गावाकडे जातो नदी पात्र मोठे असल्याने रेती साठा बऱ्या प्रमाणात आहे राम गंगा नदीवर आज दिनांक 12 ऑगस्ट ला दुपारच्या दरम्यान एक ट्रॅक्टर रेती उपसा करण्याकरता आल्याची बातमी महसूल कर्मचाऱ्यांना मिळाली माहिती मिळताच निवासी कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार दिलीप बदकी, तलाठी सौरव तुमसकर ,तलाठी तिरणकर,यांना घेऊन रामगंगा नदीच्या पात्रात वालदुर , घाटावर जाऊन रेती भरून नेत असताना पकडला ट्रॅक्टर जप्त करून तहसील मध्ये लावण्यात आला रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर हा गौरव सुनील जिड्डेवार याचा आहे .या आधीही रेती तस्करी प्रकरणी कारवाई करणाऱ्या तलाठी यास शिवीगाळ केल्याचे प्रकरण त्याच्यासोबत झाले आहे चोरीचे प्रकार बर्‍याच दिवसापासून सुरू आहे महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या डोळ्यात धूळफेक करून रेती तस्कर रेतीची चोरी करतात व वरून महसूल व व पोलीस कर्मचारी यांना वेठीस धरण्याचे काम हे करीत आहे.