
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब तालुक्यातील धोत्रा येथे मा.बालुभाऊ रूद्राक्षवार, यांनी त्यांच्या मातोश्रीच्या इच्छापूर्ती करीता सुरू केलेल्या समाज कार्याला एक हातभार म्हणून खैरे कुणबी समाजाचे आधार स्तंभ व राळेगांव तालुका खैरे कुणबी समाज मंडळाचे संस्थापक मा.श्री.मनोहरराव जूननकर, यांच्या प्रेरणेने त्यांच्या कुटुंबियांनी तसेच त्यांच्या विचाराने प्रेरीत मित्र मंडळानी काल दि १६ ऑगस्ट २०२१ला सदिच्छा भेट दिली.व तेथील वुद्ध माता वडील तुल्य वूद्ध व्यक्तीच्या अडी अडचणी तसेच ते या ठिकाणी किती दिवसापासून राहतात त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात ते कशा सोडवतात ह्यावर सविस्तर चर्चा करून मा.बालुभाऊ रूद्राक्षवार, यांनी सरांचे मोठे बंधू मा.श्री.चंद्रशेखरजी जुननकर, यांनी रू ५००० /- देणगी स्वरूपात दिले. या वेळी मा.श्री.राजुभाऊ पोटे, तसेच जुननकर कुटुंबीय यांनी वृध्दाश्रमातील माता पित्या समावेत जुननकर कुटुंबीयांनी तयार करून आणलेले भोजन दान करण्यात आले व त्यांनी पुढील आयुष्या करीता शुभेच्छा दिल्या.यावेळी सौ.कालिंदाताई जुननकर, सौ.सुनीताताई एकोणकर, सौ.शालिनीताई जुननकर, सौ.हर्षदाताई नितिन जुननकर, नितीनजी जुननकर, विनोदभाऊ पंडित, दैनिक महासागर चे राळेगांव तालुका प्रतिनिधी गजाननरावजी तुमराम सर, विशालजी लाटकर, वैभवजी धोटे, रूपेशजी येडे, प्रभाकरराव भाटकर, हे उमरी येथील मंडळी उपस्थित होते.
