भारतीय डाकघराची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना “सुकन्या”चे लाभ घेण्याचे आवाहन


प्रतिनिधी प्रवीण जोशी
ढाणकी


प्रत्येकच क्षेत्रामध्ये स्त्रीने आपला ठसा उमटविला असून महात्मा फुले यांनी स्त्री मधील हे कौशल्य गुण वेधून स्त्रीला शैक्षणिक क्षेत्रात प्राधान्य दिले म्हणूनच आज तिने शिक्षण क्षेत्रात आणि सर्वच क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे तसेच लहान मुलीचे भविष्य उज्वल व्हावे व सुखकर व्हावे म्हणून भारतीय डाक विभागाने विशेष योजना द्वारा मुलींना सुरक्षा कवच रूपाने योजना आणली असून याचा लाभ घेण्याचे आव्हान सबपोस्ट मास्तर उपडाकघर कार्यालय ढाणकी यांनी केले आहे.
सध्या आपण बघतोच आहो की अनेक खाजगी ठिकाणी जास्त व्याजदर देऊन गुंतवणूक करायला लावतात व गुंतवणूकदार सुद्धा त्यांच्या चकाकणाऱ्या कार्यालयाला भुलतो व इथेच गुंतवणूकदार व्यक्तीची फसवणूक होऊ शकते त्यामुळे जास्त व्याज दरापोटी अशा बोगस ठिकाणी गुंतवणूक न केलेली बरी अशा ठिकाणी फसगत होऊ शकते तेव्हा अशांच्या “श्रीमुखात” कोणत्याही प्रकारची आर्थिक पैशाची ठेव ठेवू नये. अल्पमुदत, दीर्घ मुदत, किंवा दैनंदिन ठेव, फसगत होईल. अशा ठिकाणी गुंतवणूक करणे म्हणजे जोखीम पत्करणे होय तेव्हा बोगस ठिकाणी व स्वयंघोषित परजीवी संधीसंधीन भंपक समाजसेवक व्यक्तीपासून दूर राहून आर्थिक व्यवहार केलेला बरा तसाच जय आणि विजयाचे नारे देऊन आंदोलने करून पण आपला सहभाग मात्र बघ्याचा व अप्रत्यक्षरीत्या सहभाग ठेवणारे व आपली आर्थिक आणि राजकीय पोळी शेकणारे “तुम लढो हम कपडे संभालते” अशी भूमिका बजावणारे ढोंगी पाखंडी शिखंडी समाजसेवक सुद्धा आजूबाजूला फिरताना दिसतात आणि अशा दरवेशी समाजसेवकांनी आपली टुमदार घरी बांधली आणि सर्वसामान्यांना मात्र कायद्याच्या कचाट्यात अटकविले यांच्यापासून व्यवहार करणे म्हणजे फसगतच होय व यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ग्राहकांनी गुंतवणूक केल्यास यांची समाजातील क्रेझ मधे अधिक गुंतवणूक केल्यास अर्थातच व्यापक “वाड”होईल शिवाय आणखीन जनतेची फसवणूक होईल तेव्हा यांना आळा घालणे जरुरी आहे. सुरक्षेची हमी व शासनाच्या देखरेखीखाली गुंतवणूक करणे म्हणजेच भारतीय डाकघर होय. आता डाक विभागामार्फत अनेक योजना राबवत आहे. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर ‘SSA Amritpex plus drive’ ही मोहीम दिनांक ९.०२.२०२३ आणि १०.०२.२०२३ ला राबविणार असून यामध्ये सर्व 0 ते 10 वर्षापर्यंतच्या बालिकांचे सुकन्या समृध्दी चे खाते काढण्याची विशेष मोहीम राबविणार असून त्यात मुलीच्या येणाऱ्या काळात शैक्षणिक अडचण व इतर अडचनी दूर व्हाव्या यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे याबाबत डाक विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत बालविकास प्रकल्प अधिकारी, हे ग्रामीण भागातील मुख्य ठिकाण असलेले अंगणवाडी या ठिकाणी याबाबत मार्गदर्शन करणार असून ९ आणि १० फेब्रुवारी रोजी सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यासाठी खास योजना राबविणार आहे ढाणकी उपडाकर कार्यालयातर्फे हे जागरूक अभियान राबविण्यात येणार आहे मुलीच्या भविष्याबद्दल जागरूक राहून बचतीचे महत्त्व नक्कीच वाढेल यासाठी डाक विभागाने सुकन्या समृद्धी योजनेचे जास्तीत जास्त खाते उघडावे याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी तारीख ९ व १० फेब्रुवारीला विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही योजना किती महत्त्वाची आहे हे सर्वसामान्यांना कळावे म्हणून भारतीय डाक घराचे कर्मचारी जनजागृती करत आहे. सार्वजनिक ठिकाण शाळांमध्ये पालक मेळावे अंगणवाडी ग्रामपंचायत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अधिपत्याखाली या मोहिमेला अधिक लोकांचा सहभाग मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.
तसेच सुकन्या बचत खाते उघडल्यानंतर पंधरा वर्षापर्यंत खात्यात प्रत्येक महिन्याला बचत करावी लागेल २१ वर्षापर्यंत हे पूर्ण होते मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर जमाशेष राशीमधून अर्धी म्हणजेच पन्नास टक्के रक्कम काढता येते व मुलीच्या विवाहसमयी खात्याच्या अटी व शर्ती राखून खाते पूर्णपणे बंद करता येते. सुकन्या समृध्दी योजनेतून मुलीला लाभ घ्यावयाचा असल्यास पालकांचे आधार कार्ड पॅन कार्ड व सोबत मुलीचे व पालकांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो व रहिवासी असलेला पुरावा असणे जरुरी आहे. यात काही त्रुटी असू शकतात जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क करावा.