आदिवासी कृती समिती उमरखेड तालुका तर्फे आयोजित जन आक्रोश मोर्चा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचा जाहीर पाठिंबा

माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी आदिवासी कृती समिती तर्फे आयोजित मणिपूर येथील आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात जन आक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालय उमरखेड इथे धडकला आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचाराचे विरोधात निघणाऱ्या या मोर्चास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमरखेड तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला होता या मोर्चात उबाठा नेते माजी आमदार तथा नांदेड जिल्हाप्रमुख मा.श्री. नागेश पाटील आष्टीकर साहेब व प्राचार्य मोहनराव मोरे हे सहभागी होते व उमरखेड तालुक्यातील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवासेना बांधवांनी जन आक्रोश मोर्चा मध्ये सामील होऊन आदिवासी बांधवांना जाहीर पाठिंबा दिला या वेळी आदिवासी समाजातील महिला युवक युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते