
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्य सरकार ने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना निवडणूकीच्या तोंडावर आणली विधानसभा निवडणुक अवघे काही महिने शिल्लक आहे अशी प्रलोभने दाखवणं ही शेवटी राजकीय पॉलिसी आहे.परंतु सरकार या योजना ची अंमलबजावणी करते की नाही ही सामान्य कुटुंबातील महिला ची शंका आहे अशी स्पष्ट मत आम्ही “‘ लाडकी बहिण योजना “‘ चे फार्म भरून देत असताना दिसुन येत आहे. ग्राम स्वराज्य महामंच यांनी या योजना ची अंमलबजावणी होण्यासाठी पुढाकार घेण्याचे कारण राळेगाव विधानसभा हा मतदारसंघ आदिवासी बहुल मतदार संघ आहे आणि या ठिकाणी आदिवासी दलित गरीब महिला पात्र लाभार्थी भरपूर आहे आणि या साध्या भोळ्या समाजातील महिला ची आर्थिक लुटमार होवू नये म्हणून या साठी ग्राम स्वराज्य महामंच चे अध्यक्ष मधुसूदन कोवे गुरुजी यांनी पुढाकार घेऊन गरीब आदिवासी महिला आणि सामान्य महिला “‘ लाडकी बहिण योजना”‘ चे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोफत सेवा देत आहे या मुळे महिला च्या महत्वपूर्ण प्रतिक्रिया मिळतं आहे. या योजना मध्ये फार्म भरतं असताना अनेक महिला नी चर्चा केली असी कामं हे राजकारणी लोक काऊन करतं नाही इथं गरीबाचं भलं होतं नाही का ? की फक्त मतं मांगाले यायचं म्हणून आमचा सरकार वरुन आणि राजकारणी लोकावरुण विश्वास उडाला आहे काही महिलांनी मा मधुसूदन कोवे गुरुजी यांच्या कामाचे अभिनंदन केले .ग्राम स्वराज्य महामंच या सामाजिक संघटना चा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातील महिला आणि सामान्य गरीब कुटुंबातील लोक सक्षम करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे अशां अनेक योजना ची माहिती आम्ही थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतो या माझी लाडकी बहिण योजना यशस्वी करण्यासाठी मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच, आणि आमचे मित्र मा गिरधर ससनकर माजी मुख्याध्यापक, श्रीमती आशा काळे, आदर्श शिक्षिका बळवंतराव मडावी साहेब, हर्षल आडे विठ्ठल धुर्वे प्रल्हाद काळे गुरुजी वर्षा आडे कृष्णा भोंगाडे यांचा कामाची अंमलबजावणी करण्यासाठी निस्वार्थी सहभाग आहे.
