पाच वर्षां पासून पडलेलं भगदाड आज ही जैसे थे ?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट बी मधून राळेगांव शहरातील प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ कडे जाणाऱ्या ॲप्रोच सिमेंट रस्त्याला नालीच्या मधोमध एक खूप मोठं भगदाड गेल्या पाच वर्षांपासून पडलं आहे.पण नागरिकांनी खूप वेळा या संदर्भात नगर पंचायत राळेगांव ला तक्रारी दिल्या आहेत पण दुर्लक्षित धोरणा मुळे हे भलं मोठं भगदाड आपल्या दुरुस्ती च्या प्रतिक्षेत आहे. या सह पथदिवे बंद, मधोमध असलेले रेलिंग तुटलेले, दोन्ही बाजू घ्या नाल्या बुजंलेल्या आहे.
दिलीप बिल्डकाॅन कंपनी ने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट बी च्या बांधकामा च्या वेळी शहरातील मुख्य सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा नाल्या, त्या वर स्लॅब ॲप्रोच रस्ता, मधोमध पथदिवे तयार करुन दिलेत.
या काळात ही सर्व कामे पूर्ण झाली, त्या वेळी भाजपा ची सत्ता नगर पंचायत राळेगांव मध्ये होती.
त्याचं दरम्यान अनेक ठिकाणी दर्जा हिन कामं चा तमाशा बघत बसल्या ने, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कामांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी विशिष्ट कालावधी दिलीप बिल्डकाॅन कंपनी ला प्रशासनाने दिला असतानाही मागील व या वेळच्या नगर पंचायत राळेगांव च्या “बाॅडी” ने कोठलाही पाठपुरावा न केल्याने, यांच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मागील पंचवार्षिक मध्ये याच प्रभागातून दस्तूरखुद्द नगराध्यक्षा, बांधकाम सभापती होत्या आणि आता नवीन “बाॅडी” मध्ये दोन बांधकाम सभापती याचं प्रभागातून असूनही ही साधी समस्या पाच वर्षांपासून सुटलेली नाही ही शोकांतिका चं नाही का?
सध्या अनेक अशाच छोट्या मोठ्या समस्या बांधकाम विभागाच्या फक्त पदाधिकाऱ्यांचा “ॳकुश” अधिकाऱ्यांवर नसल्याने अपघाता ला बळी मात्र नागरिकांना पडावं लागतं आहे.