राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ला राळेगांव तालुक्यातील किन्ही (जवादे)
येथे रास्ता दुभाजक द्या
(मनसेचा नागपूर महामार्ग प्रकल्प संचालकांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा ईशारा)

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक नसल्याने जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून दुभाजक ओलांडून चुकीच्या दिशेने प्रवास करावा लागत असल्याने अपघातांच्या संख्येत होणारी वाढ टाळण्यासाठी किन्ही(जवादे) येथे दुभाजक देण्याची मागणी मनसेच्या वतीने महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालकांकडे करण्यात आली आहे.
किन्ही (जवादे) हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर स्थित असून सदर गावाला बरीचशी गावे जोडलेली आहेत. सदर गावाची लोकसंख्या ही जवळपास १५००० असून त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची संख्या २५०० इतकी आहेत. धुमक चाचोरा, चाचोरा, एकुली विहीरगाव, खैरगाव इत्यादी १५ गावाला जाताना किन्ही (जवादे) या गावावरूनच जावे लागते. किन्ही (जवादे) येथे येण्यासाठी दक्षिणेकडून ३ किमी तर उत्तरेकडून २ किमी एवढ्या अंतरावर दुभाजक असल्यामुळे एवढ्या दूरवर असलेल्या अंतरावरून विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करणे धोक्याचे असून बऱ्याचवेळा अपघात झालेले आहेत. तरी अपघातांची तीव्रता लक्षात घेता किन्ही (जवादे) येथे दुभाजक देऊन किन्ही (जवादे) तसेच इतर गावांच्या ग्रामवासियांच्या अडचणीचे निराकरण करावे अन्यथा ग्रामवासियांच्या न्यायासाठी ग्रामवासियांना सोबत घेऊन मनसेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ला किन्ही (जवादे) येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा ईशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष सुरज लेनगुरे, सरचिटणीस उमेश पेंन्दोर, उपाध्यक्ष गौरव चवरडोल यांनी यावेळी दिला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर किन्ही(जवादे) याठिकाणी दुभाजक नसल्याने याठिकाणी घडलेल्या अपघातामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या अपघातांची तपशीलवार माहिती पोलीस स्टेशन यांच्याकडून महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आली.परंतु नागरिकाच्या जीवांचे प्राधिकरण व्यवस्थापनाला कोणतेही सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या ठिकाणी रस्ता दुभाजक निर्माण न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल.


:- शंकर वरघट (मनसे जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ)