
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
- *
३० सप्टेंबर २०२३ “‘ विदर्भवाद्यांची पायदळ वारी, रुख्मिणी च्या माहेरी कौंढण्यपुरी”‘ ही पदयात्रा आष्टी ( शहीद ) ते कौंढण्यपुर पन्नास किलोमीटर अंतर विदर्भातील अनेक पदाधिकारी यांनी तीन दिवस पयदल चालुन पुर्ण केले. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे यासाठी गावा गावात जाऊन लोकांत जागृती निर्माण करण्यासाठी १०० विदर्भ राज्य आंदोलन समिती चे पदाधिकारी पदयात्रेत सहभागी होते. या पदयात्रा मध्ये प्रामुख्याने सहभाग,मा डॉ रमेश गजबे माजी आमदार मुकेश मासुरकर अध्यक्ष युवा आघाडी विदर्भ राज्य आंदोलन समिती मा कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच सुदाम राठोड चंद्रपूर डोईफोडे काका बुलढाणा मानेकर काका वरुड सतिश दाणी वर्धा रंजनाताई मामर्डे अध्यक्ष विदर्भ महिला आघाडी लढ्ढा साहेब अमरावती गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरिक विदर्भावादी ज्योती खांडेकर नागपूर श्रीधर ढवस आरिफ शेख घाटंजी यवतमाळ ढोक काका आणि शैला देशपांडे, मिलिंद जी देशपांडे यांनी सर्व पदयात्रेत सहभागी विदर्भवाद्यांची व्यवस्था केली आणि पदयात्रेत सहभागी झाले होते.
