
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भाजपा च्या पहिल्याच यादीत राळेगाव विधानसभा मतदार संघात माजी मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांची उमेदवारी जाहीर झाली. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये या मुळे उत्साह निर्माण झाल्याचे दिसतं आहे. या पार्श्वभूमीवर अशोक उईके यांनी भाजपा ची सर्वसामान्य जनते प्रती असलेली बांधिलकी, महायुती ने केलेली विकासकामे व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर तब्बल पन्नास हजाराच्या लीड ने राळेगाव विधानसभा मतदार संघातून विजयी होऊ असा आत्मविश्वास असल्याची भावना व्यक्त केली आहे.
लाडकी बहीण योजना ही अंत्यत महत्वाकांक्षी योजना असून महिलांना सन्मान देण्याचे काम आम्ही केले,आमच्या लाडक्या बहिणी निश्चितच साथ देतील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या सोबतच सर्व समाज घटकांसाठी विविध विकासकामे मतदार संघात केली. शेतकरी, कष्टकरी माणूस आमच्या सोबत आहे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. महायुती चे सर्व घटक पक्ष सोबत असतील ही निवडणूक अंत्यत महत्वाची असून कार्यकर्त्यांनी सजग राहावे. विरोधकांच्या नै्रिटिव्ह ला विकासकामे व सर्वसमावेशक विचारधारा हे उत्तर असल्याची भावना त्यांनी व्यत केली. मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले. पक्षश्रेष्ठींच्या विश्वासामुळे मला पुन्हा एकदा राळेगाव विधानसभा क्षेत्राच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करण्याच्या संधीचे भाग्य लाभले आहे. मला ही संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राळेगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे उमेदवारी जाहीर झाल्या उपरांत त्यांनी आभार मानले.
वेळोवेळी दर्शविलेला विश्वासाबद्दल भारतीय जनता पार्टीची ही या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त केले . या विश्वासाला पात्र ठरविण्यासाठी मी अविरत प्रयत्न करेन, असे वचन त्यांनी दिले .
