
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहरातील टेंभेश्वर नगर येथे राहणारे व अत्यंत बेताची परिस्थिती असलेले नामदेव गायकवाड व विमलबाई गायकवाड हे दांपत्य अधिवास करतात व त्यांनी स्वतः अनेक काबाडकष्टाचा डोंगर उचलून आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यांना योग्य शिक्षणाचा मार्ग दाखविला शासकीय नोकरी मिळणे तसे दुरापास्त पण एकाच कुटुंबातील दोन मुलांनी शासकीय नोकरी ला गवसणी घालून नवीन पायंडा पाडला. अनेक वेळा परीक्षा देऊन सुद्धा अपयश आलेल्या मुलांसाठी हे दोन तरुण प्रेरणास्त्रोत ठरले गवंडी काम करत आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असताना मुलांना उत्तमपणे शिक्षण देऊन व त्यांना वेळोवेळी शिक्षणाचे महत्त्व पटवून नामदेव गायकवाड यांनी व त्यांच्या पत्नीने योग्य मार्गदर्शन करून व त्यांच्या मेहनतीतून आणि केलेल्या योग्य कर्मामुळे आज त्यांची दोन्ही मुले उच्च पदावर पोहोचले आहे. गुणवत्ता व कौशल्य असल्यास परिस्थिती कधीच आड येत नाही आदिनाथ व लक्ष्मण या दोन भावंडांनी दाखवून दिले.नुकताच आदिनाथ ने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर मुलांप्रमाणेच बँकिंगच्या क्षेत्रातील परीक्षा देत होता व काही दिवसात त्याला यश आले स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या महत्त्वाच्या पदावर तो रुजू झाला असून येणाऱ्या काळात अजून परीक्षा देऊन उच्च पदावर जाण्याचा त्याचा मानस आहे. तर दुसरा मुलगा लक्ष्मण हा देश सेवेसाठी सज्ज झाला आहे हजारो तरुण या परीक्षेसाठी तयार करीत असतात पण यश फार मोजक्या तरुणांना मिळते त्यातीलच एक म्हणजे लक्ष्मण होय आणि अग्नीविर परीक्षा पास होऊन देश सेवेसाठी रुजू होणार आहे तर नामदेव गायकवाड यांना आणखीन एक मुलगा सुमित असून तो पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीवर आहे. मूळचे महागाव तालुक्यातील वेणी धरण येथील असलेले गायकवाड दाम्पत्य मागील पंचवीस वर्षांपूर्वी ढाणकी शहरात काही कामानिमित्त आले आणि इथे स्थायिक झाले गवंडी काम करत असताना कष्टाच्या यातना आपल्या मुलांना होऊ नये यासाठी जीवाचा आटापिटा करत असत. मुलांनी सुद्धा आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून योग्य अभ्यासाचे नियोजन लावून यश प्राप्त केले. त्यामुळे आई विमल गायकवाड वडील नामदेव गायकवाड हे आपल्या मुलांनी कष्टाची जाण ठेवून यश प्राप्त केले त्यामुळे यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले दांपत्याचा व त्यांच्या मुलांचा यथोचित सत्कार करणाराला यावेळी. महेश पिंपरवार, साईनाथ मंतेवाड, उमेश योगेवार, दत्ता सुरोशे, पंकज केशवाड, सुभाष गायकवाड, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
चौकट
परिस्थिती कितीही अवघड असली तरी जिद्द आणि स्वतःवर विश्वास असल्यास यश मिळते सध्या सुशिक्षित बेरोजगारी वाढत असताना व अनेक जण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असताना अनेकांना अपयश येत आहे तेव्हा या दोघांनी अत्यंत अवघड परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होणे हे या भागातील तरुणांसाठी नवी प्रेरणा आहे म्हणूनच संपूर्ण गायकवाड परिवाराचा सन्मान गौरव करतो आहे नक्कीच येणाऱ्या काळात आदिनाथ व लक्ष्मण या तरुणांकडे बघून अनेक तरुण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन यश प्राप्त करतील
रोहित विष्णुदासजी वर्मा.
भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष ढाणकी.
