जागजई येथील श्रीराम मंदिर विठ्ठल देवस्थानातील दानपेटीचे कुलूप तोडून पंधरा हजार रुपये केले लंपास

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जागजई येथील श्रीराम मंदिर विठ्ठल श्री निर्गुणशी महाराज संस्थान जागजई येथील दानपेटीचे कुलूप कोंडा तोडून दहा ते पंधरा हजार रुपये चोरून नेल्याची घटना दिं १ एप्रिल २०२३ रोज शनिवारला दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान घडली असून याबाबत तक्रार फिर्यादी मंदार कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशनला दिली आहे.
श्री राम मंदिर विठ्ठल व श्री निर्गुणशी महाराज संस्थान येथील पुजारी मंदार दिवाकर कुलकर्णी हे २०१९ पासून मंदिरात पुजारी असून सदर मंदिरातील चाबी ही त्यांच्याकडे असते जर देवस्थान मध्ये कोणी पूजेला किंवा देवदर्शनाला आले तर मंदार कुलकर्णी किंवा त्यांची पत्नी देवस्थानचे दार उघडून देत असते व त्यानंतर ते स्वतःच देवस्थानचे कुलूप लावून देत असायचे परंतु दिं१ एप्रिल २०२३ रोज शनिवारला मंदार कुलकर्णी हे सकाळी राळेगाव येथे काही कामानिमित्त गेले होते त्याच दिवशी आंजी अंदोरी येथील भक्त लोकांचा स्वयंपाकाचा कार्यक्रम होता तेव्हा मंदार कुलकर्णी यांच्या पत्नीने देवदर्शनासाठी मंदिराचे कुलूप उघडून दिले होते व ती घरी निघून गेली त्यानंतर दुपारी मंदार कुलकर्णी हे राळेगाव वरून आल्यानंतर ते ३:१५ वाजताच्या दरम्यान मंदिरात गेले असता त्यांना मंदिरातील असलेल्या दानपेटीचे कुलूप लावलेला दिसले नाही व दानपेटीचे अर्धवट झाकण उघडे दिसले तेव्हा कुलकर्णी यांनी येथील देवस्थान कमिटीच्या सदस्यांना या बाबतची माहिती दिली असता मंदिरातील अज्ञात चोरट्याने दान पेटीचे कुलूप व कोंडा तोडून दहा ते पंधरा हजार रुपये चोरून नेले असल्याची तक्रार फिर्यादी मंदार कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशनला दिली असून अज्ञान चोरट्याविरुद्ध ३७९ भावी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जमादार सुभाष काळे ,गोपाल मास्टर हे करीत आहे.