
मारेगाव तालुक्यातील मांगली शिवारात एका 65 वर्षीय वृद्धाची तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून हत्या केल्याची घटना आज दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता सुमारास ही घटना उघडकीस आली असुन या खळबळजनक घटनेने तालुका हादरला असून ही घटना कुंभा परिसरात मांगली शिवरात बाळू पांढरे यांच्या शेतामध्ये मारोती शेंद्रे हे नेहमी प्रमाणे शेतामध्ये काम करण्यासाठी आले होते मात्र मारोती यांचा शेताध्ये तीक्ष्ण हत्याराने वर केल्याने मृतदेह आढळून आला असून. माहितीनुसार, मयत इसमाचे वय (65 ते 70) वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मारोती शेंद्रे हे कुंभा येथील रहिवासी असून ते बाळू पांढरे यांच्या शेतामध्ये काम करणारा मजूर असल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी एकच्या सुमारास त्याची हत्या झाल्याचा अंदाज आहे व्यक्त केला जात आहे.
