
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील एल. एम. बी. उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लता संजय भोयर ( राऊत ) ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर याच शाळेतील जेष्ठ शिक्षक राजू भोयर सर यांची मुख्याध्यापक पदी निवड करण्यात आली. राजू भोयर सर यांची निवड झाल्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ, शाळेतील शिक्षक निलेश मेंढे सर, शिवा जाधव सर, दिनेश गेडाम सर, प्रतिक भोयर सर ,कु.अनुष्का मॅडम,कु.अंकिता मॅडम यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थी बांधवांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण पसरले आहे.
