

राळेगाव तालुका प्रतिनिधी
रामभाऊ भोयर(9529256225)
राळेगाव तालुक्यातील सावंगी(पेरका)येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत व्यवस्थापन समितीची निवड दि.08/12/2021 रोजी झाली.यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अनिलराव सुरकर तर उपाध्यक्षपदी अतुलराव बेडदेवार यांची निवड करण्यात आली.तर सदस्यपदी
1)दिलीपराव कोवे,
2)किरणराव आडे,
3)सौ.शुभंगीताई मेसरे,
4)सौ.नम्रताताई भोयर,
5)सौ.शितलताई मिसेवार,
6)सौ.योगीताताई कोवे,
7)सौ.गीताताई बांडाणे
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रमेशकुमार दवे,गुणवंतराव इंगोले सर,डॉ.भारती ताठे मॅडम,कु.स्मिता काळे मॅडम,कु.मंगला आगरकर मॅडम,कु.सोनल नासरे मॅडम.यांच्या सह पालक वर्ग उपस्थित होते.
या निवडीनंतर शाळेतील सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व शासकीय विविध योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी व्हावी अशी भावना अध्यक्ष अनिलराव सुरकर यांनी व्यक्त केली.
निवडीबाबत सर्व पालक,व्यवस्थापन समिती सदस्य व सर्व हितचिंतकांचे आभार अध्यक्ष अनिलराव सुरकर व उपाध्यक्ष अतुलराव बेडदेवार यांनी व्यक्त केले.
अशा पद्धतीने खेळीमेळीचे वातावरणात समितीची निवड करण्यात आले.
