
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे एक नोव्हेंबर रोजी विमल ऍग्रो जिनिंग मध्ये कापसाच्या खरेदीला सुरुवात होताच रिधोरासह परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे. राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार येथील विमल ऍग्रो टेक जिनिंग मध्ये आज कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे यामध्ये कापसाला ७ हजार १५१ रुपये प्रतिक्विंटल भाव देऊन कापूस खरेदीचा शुभारंभ केला आहे. सदर रिधोरासह परिसरातील शेतकऱ्यांनी ६० ते ७० चार चाकी वाहन व वीस ते पंचवीस बैलबंडीची आवक विमल ऍग्रो जिनिंगला आली आहे. सदर या शुभमुहूर्ताला राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर, गजानन पारखी तर रवींद्र भन्सारी, महेंद्र बोथरा, राजू व्यापारी, राजेंद्र कोचर, नरेश बागमार, रुपेश बागमार, साईनाथ ताठे यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस खरेदीचा शुभारंभ झाला आहे.
