प्रयोगशील शेतकरी पुत्राचा अपघाती मृत्यू! जुगाड करताना काळजी घेण्याची गरज

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मौजा मांडवा ता.जी.वर्धा येथील चि.अभिजित बंडुजी वंजारी वय २० वर्षे,याचा आज सकाळी त्याच्याच शेतात तुरीचे शेंडे कापण्याच्या कटरने अपघाती मृत्यू झाला.
नेहमीप्रमाणेच अभिजित आपल्या शेतावर गेला असता आज त्याने तुरीचे कोवळे कोवळे शेंडे कापण्यासाठी कटर मशिनचा वापर करित असताना अचानक त्याच मशिनच्या कटरने ( धारधार पाते) त्यांच्या शरिरावर ईजा झाली व शेतातच त्याचा मृत्यू झालेची बातमी रेडिओ वर्धाला कळली आहे.
सद्या शेतात तुरीचे शेंडे कापण्याकरिता( खुडण्यासाठी) अनेक मशिन बाजारता उपलब्ध आहे.अभिजितने असेच शेतात बॅटरीवर चालणार्या फवारणी करण्याच्या स्प्रे पंपावर त्याने हे कटर मशीन तयार केले असल्याची माहीती श्री #नितेश_कराळे सर ( कराळे मास्तर) यांनी रेडीओ वर्धा शी बोलताना सांगितले.ते पुढे असेही म्हणाले की आमचा अभिजित हा अत्यंत प्रयोगशिल होता जसा फुलसांवगी, यवतमाळचा हेलिकॉप्टर बनविणारा शेख होता त्याच्याच सारखा हा अभिजित नाविण्यपुर्ण प्रयोग करायचा.त्याने टॅक्टर ला जोडण्यात येणारी ट्राली जी शेतातील साहित्य ने आण करायला आवश्यक असते,त्याने तशीच आपल्या मोटरसायकल वर ट्राली तयार केली होती.