
कोरोना काळात गरीब व मजूर वर्ग यांची भूक शासकीय स्वस्त राशनावर भागत असून हातात रोजगार नाल्याने गरीब व मजुर वर्ग महिन्या ला मिळत असलेले स्वस्त राशन च्या दुकाना कडे टक्क लावून बगत असतात पण काही स्वस्त राशन (कंट्रोल) दुकान धारक यांनी दुकानास कमाईचे साधन बनविले असल्याचे देखील पाहायला मिळतात त्याचेच एक उदाहरण मौजे सारखनी येथे पाहायला मिळत आहे
येथील अलीम शेख यांनी जिल्हा अधिकारी व जिल्हा राशन पुरवठा अधिकारी यांना राशन दुकानदार यांची लेखी तक्रार दिलेली आहे अलीम शेख यांनी सांगितले आहे की सदरील राशन दुकानदार हे शासकीय दरानुसार पैसे घेत नसून अतिरिक्त पैसे राशन धारक यांच्या कडून घेतो
राशन धारक यांनी पावती मांगीतली असता काही कारण सांगून त्यांना पावती देत नाही
ठरलेल्या शासकीय दरा नुसार राशन धारक यांच्या काडून पैसे न घेता अतिरिक्त पैसे घेतो
पुढील विषयात त्यांनी सांगितले की राशन दुकान धारक जाणून बुजून महिन्याच्या अखेरीस राशन आणून महिन्यात फक्त 2 दोनच दिवस दुकान सुरू ठेवतो ज्यामुळे कोरोना चा संसर्ग वाढण्याची देखील यांना भीती नाही
अखेरीस उरलेले राशन धारक यांना महिना संपल्याने मशीन मधील महिना क्लोज झाला असे सांगतो तर उर्वरित राशन जाते कुठे असा प्रश्न देखील अलीम शेख यांनी प्रशासकीय अधिकारी यांना केला आहे
मौजे सारखनी येथे
माहे सप्टेंबर चे pm योजनेतील राशन वाटप का केले नाही सरील महिन्याचे राशन गेले कुठे याची चौकशी तात्काळ करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी जिल्हा अधिकारी यांच्या सोबत अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे केली आहे
त्यांच्या मांगणीला गावकऱ्यांनी समर्थन देत किनवट तालुक्यातील सर्व स्वस्त राशन दुकान धारक यांची चौकशी करण्याची मांगणी केली आहे
