प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ कायदेविषयक सल्लागार पदीं अँड शेख अन्सार यांची नियुक्ती.

ढाणकी: महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या न्याय हक्क अधिकारासाठी नेहमी कार्यदक्ष असलेल्या पत्रकार संघटना म्हणून नावलेकीक असलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघात कायदेविषयक सल्लागार पदीं अँड शेख अन्सार यांची निवड करण्यात आली. ही निवड पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डि टी आंबेगाव व विदर्भ अध्यक्ष केशव सावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड बाळासाहेब चंद्रे पाटील काँग्रेस ढाणकी शहराध्यक्ष अमोल तुपेकर यांच्या प्रमुख उपस्थित आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अँड शेख अन्सार यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब चंद्रे पाटील हे होते. अँड शेख अन्सार यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. अँड शेख अन्सार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनीं लोकशाहीचे चार स्तंभ असून, शासन प्रशासन न्यायव्यवस्था चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता हे असून पत्रकारांचे महत्त्व सांगितले. पत्रकार हा नेहमी सजग अस्नेआवश्यक असून तो गोरगरिबांच्या न्याय व हक्कांसाठी लढणारा असावा. पत्रकार नेहमी सत्याची बाजू घेऊन चालणारा असावा असे प्रतिपादन केले.तर अध्यक्षिय भाषणात बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी त्यांच्या शालेय जीवनात प्रसंग सांगितलें. अँड शेख अन्सार व आम्ही दोघांनी एकाच शाळेत शिक्षण घेतलें. घरंची परिस्थिती हल्लाखिचि असताना शेख अन्सार यांनी शून्यातून विश्व निर्माण करून पदवीधर होऊन ते वकील झाले. आज झालेल्या निवडीबद्दल त्यांनी त्यांचें अभिनंदन केले. व तसेच प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.