
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई तथा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगाव आयोजित विद्यार्थी विद्यार्थिनीच्या समुपदेशनासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन दिं १९ जून २०२४ रोज बुधवार ला सकाळी १०:०० वाजता स्वर्गीय भाऊसाहेब कोल्हे सभागृह वसंत जिनिंग राळेगाव येथे करण्यात आले आहे .
या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके हे असणार आहे तर मार्गदर्शन शिबिराला व्याख्याते म्हणून डॉ.महेश बोर्डे डॉ. गणेश सव्वालाखे राहुल पळवेकर या तज्ञ मार्गदर्शकाद्वारे मार्गदर्शन करणार असून या शिबिरात दहावी व बारावी नंतर पुढे काय ,भविष्यातील रोजगारांच्या संधी, व्यक्तिमत्व विकास ,व्यवसाय मार्गदर्शन ,मुलाखतीची तयारी, आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या शिबिराला राळेगाव अंतरगाव कळंब व बाभूळगाव या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच तालुक्यातील सर्व विद्यालय महाविद्यालय विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन राळेगाव, अंतरगाव, कळंब, बाभुळगाव, येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांनी केले आहे तरी ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या मार्गदर्शन शिबिराबाबत अधिक माहिती व प्रवेश २०२४ प्रक्रियेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगाव, अंतरगाव,कळंब, बाभूळगाव येथे संपर्क साधावा.
