
प्रतिनिधी ,प्रवीण जोशी
ढाणकी.
मराठवाड्यातील किनवट, माहुर विदर्भातील उमरखेड, पुसद,महागाव तालुक्यात मागील तीन वर्षा पासून संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आध्यात्मिक व व्यसन मुक्ति अभियान अतिशय प्रभावी ठरले आहे.
विदर्भ मराठवाडा या अतिशय दुर्गम भागात बंजारा व आदिवासी समाज बहु संखेने राहतात. या विभागामध्ये औद्योगिक कारखाने नसल्याने लोकांना वर्षभर काम मिळत नाही, शिक्षण शिकून नोकरी मिळत नसल्याने नवतरुण वर्ग व्यसनाधीन झालेला आहे. व्यसनामुळे आपले कुटुंब उध्वस्त होत आहे कुटुंबाबरोबर समाजाचेही फार मोठे नुकसान झालेलं आहे,अशा भयानक परिस्थितीमध्ये देविदास चव्हाण डोंबिवलीकर यांच्या प्रयत्नाने आणि पुढाकाराने आणि निस्वार्थ सेवेने या पाच तालुक्यातील जवळपास दोन हजार कुटुंब सुखी झालेले आहे. आध्यात्मिक प्रबोधनाचा आधार घेऊन या विभागातील लोकांना,तरुणांना ते आध्यात्मिक संत निरंकारी मिशनच्या विचारांशी जोडत आहे. अध्यात्मिक विचारधारेमुळे आज समाजामध्ये जातिभेद अंधश्रद्धा कर्मकांड यांना मूठ माती देत महापुरुषांच्या विचारांची सांगड घालून लोकांना मानवतेच्या व माणुसकीच्या प्रवाहामध्ये आणत आहेत.कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, कोणी सिख ईसाई नसून आपण सर्व एक आहोत,समान आहोत हे विश्वबंधुत्व विचार आज जनमानसापर्यंत पोहोचण्याचं कार्य सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री देविदास चव्हाण हे रात्रंदिवस करत आहेत संत महापुरुषांच्या विचाराची सांगड घालून व्यसनाधीन व भरकटलेल्या नव तरुणांना साध्या सोप्या व आपल्या मूळ बंजारा आदिवासी मराठी भाषेचा आधार घेऊन समाजामध्ये जनजागृती करत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील या अतिदुर्गम भागामध्ये प्रत्येक तांड्या तांड्यामध्ये गावा गावा मध्ये आध्यात्मिक विचाराने प्रभावित होऊन जातीभेद वर्णभेद धर्मभेद गरीब श्रीमंत उच निच या संकुचित विचारातून नवतरुण बाहेर पडत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतिवीर संत सेवालाल महाराज यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने आता साकार होत असताना दिसत आहे.
श्री चव्हाण यांच्या या महान परोपकारी व मानवतेच्या महान कार्यामुळे आज हजारो हजारो तरुण नशा पासून मुक्त तर झालेलेच आहे परंतु आपल्या परिवारामध्ये आई-वडिलांची सेवा करणे आपल्या परिवाराकडे लक्ष देणे मुलांच्या शिकणाकडे लक्ष देणे आरोग्याकडे लक्ष देणे हे घरोघरी दिसून येत आहे. जर हृदयामध्ये माणुसकी परोपकार सेवा, क्षमा, नम्रता हे मानवीय गुण असेल तर माणूस नराचा नारायण होऊ शकतो हे दाखवून दिलेले आहे. पृथ्वीतलावर एकच मानव जात आहे, आणि एकच माणुसकी हा धर्म आहे हे ठामपणे सांगून आपण सर्व भाऊ भाऊ आहोत, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, माणुसकीने वागले पाहिजे, आपल्या परिवारांची त्याचबरोबर समाजाची व स्वतःची आध्यात्मिक उन्नती क कशी होईल याकडे भर दिला पाहिजे जेणे करुन् मनुष्य जन्म जे मिळालेला आहे त्याचं सार्थक झाले पाहिजे. आध्यात्मिक विचाराने माणसातली माणुसकी परोपकार सेवाभाव जागृत होऊन कुटुंबामध्ये सुख समाधान आणि शांती नांदून समाजाचा सुद्धा विकास होऊ शकतो हे आज स्पष्ट झालेले आहे. शेकडो वर्षांपूर्वी महापुरुषांनी दिलेला संदेश आज श्री चव्हाण हे आपल्या कौटुंबिक जबाबदारी व महानगरपालिकेतील नोकरी सांभाळून स्वखर्चाने अनमोल वेळ काढून आपल्या मूळ गावी व परिसरात गावोगावी तांडा तांडा मध्ये जाऊन अध्यात्मिक ज्ञान व व्यसनमुक्ती बद्दल जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे या महान व परोपकारी कार्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील पाच तालुक्यामध्ये आनंदाचे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
