उपजिल्हा रुग्णालयासाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव मतदार संघ अस्तित्वात आला तेव्हापासून अनुसूचित जाती जमाती याकरिता राखीव आहे राळेगाव तालुका हा जिल्ह्याच्या ठिकाणापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तालुक्याच्या आरोग्याच्या सुविधा नगण्य आहे . खाजगी डॉक्टरांकडून सामान्य गरीब माणसाची लूट होत आहे .किमान चांगल्या आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळाव्या ग्रामीण रुग्णालआहे पण तिथे डॉक्टर इतर स्टॉकर्मचाऱ्यांची ची कमी आहे कुठल्याच तपासण्या करिता मशीन उपलब्ध नाही आम्हाला याकरिता उपजिल्हा रुग्णालयाची शासन मान्यता द्यावी अशी मागणी राळेगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे . जिल्ह्यातील इतर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय झाले असताना आदिवासी बहुल राळेगाव तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता का नाही असा प्रश्न निवेदनकर्त्यांनी केला आहे . सामान्य माणूस यवतमाळ वर्धा सेवाग्राम येथे जाऊन उपचार करून घेऊ शकत नाही तालुक्यातील आरोग्य सेवा पूर्णता कोलमडली आहे . तालुका वैद्यकीय अधिकारी निद्रास्त अवस्थेत असल्याचे सध्या दिसत आहे .आरोग्य केंद्र उपकेंद्र कुछ कामी .झालेले आहे सध्या तालुक्यात डेंगू मलेरिया टायफाईड सात रोग सुरू आहे खाजगी दवाखाने तुडुंब भरलेली आहे . खाजगी डॉक्टर अव्वाच्या सव्वा पैसे उकळतात . धानोरा वाढोणाबाजार वरध दहेगाव केंद्र व यातील उपकेंद्र या ठिकाणी कधी डॉक्टर असतात नसतात तर औषधी उपलब्ध नसते रुग्नाला भरती करण्याची कुठलीच सुविधा या ठिकाणी नाही कुठल्याच गावात आरोग्य संदर्भात अभियान नाही उपाययोजना नाही तालुक्यातील राळेगाव शहराला लागून असलेल्या गोपाल नगर या पारधी समाजाच्या गावामध्ये शंभर टक्के हा आदिवासी पारधी समाज असताना या गावांमध्ये डेंगूची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु अद्याप पर्यंत या गावाला तालुका वैद्यकीय अधिकारी केंद्रातील डॉक्टर यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेच्या आहे त्यांचा या बिनकामी अधिकार्यावर अंकूश असणे गरजेचे आहे . आरोग्याचा प्रश्न सामान्य माणसाशी निगडीतअसताना याकडे गांभीर्याने न पाहता चलता है चलने दो असे म्हणून चालणार नाही राळेगाव शहरात डेंगू चे पेशंट आहे डेंगूने तालुक्यात थैमान घातले आहे . यावर वरिष्ठांनी लक्ष ठेवायला हवे ग्रामीण रुग्णालयात काही औषधांचा तुटवडा पडला आहे .औषधी मिळत नाही असे रुग्ण सांगतात लाखो रुपये खर्च करुण उभे केलेले ट्रामा केअर सेंटर विना डॉक्टर खाली पडले आहे . उपजिल्हा रुग्णालय झाल्यास मोठी इमारत डॉक्टर नर्स इतर स्टॉपमिळेल व इतरत्र कुठे जाण्याची गरज राहणार नाही रुग्णांना येथेच भरती करण्याची सोय राहील यामुळे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी तालुक्यातून जोर धरत आहे या संदर्भात राळेगाव मतदार संघाचे आमदार प्रा डॉअशोक उईके, जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ यांनाही उपजिल्हा रुग्णाल याची मान्यता द्यावी अशी मागणी निवेदनातून निवेदनकर्त्यांनी दिली आहे उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे हा निकाली काढावा असे नागरिकांचे मत आहे अन्यथा यापुढे तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे . निवेदन देतांना नप चे बाधकाम सभापती मंगेश राऊत अरविंद तामगाडगे सैय्यद लियाकत अली प्रहार जिल्हा उपाध्यक्ष संजय दुरबूडे प्रा अशोक पिपंरे राजू रोहणकर गणपतराव ताटेवार अँड वैभव पंडीत दिलीप कन्नाके नितीन कोमेजवार बालु दरणे आकाश हिकरे विलास दुधपोळे शुभम चिडाम राहूल बहाळे अंकूश वडडे अकरम खान मजहर बब्बर अयोदिन काझी ओम डाखोरे संतोष सिरसागर रोहीत वर्मा यश घडूले फैजल शेख संतोष शेंडेकर चेतन बेंबारे सागर लड़के विजय कोकांडे संदेश धानोरकर भपेन्द्र चांदेकर मोहन वसू प्रशिक भोंगाडे तहसीलदार राळेगाव यांना निवेदन देतांना उपस्थीत होते .