
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
थोडक्यात वृत्त असे की, फिर्यादी हिने दिनांक २५.०९.२०१८ रोजी आरोपी याचे विरूध्द पोलीस स्टेशन वडकी ता. राळेगाव जि. यवतमाळ येथे सरकारी कामात अडथळा निर्माण करून विनयभंग केल्याचे कारणावरून तक्रार दिली होती. सदर तक्रारीवरून आरोपी विरूध्द भांदवीचे कलम ३५३, ३५४ ड अंतर्गत अपराध क्र ३१८ / २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर अपराधाचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपी विरुध्द विद्यमान सहा. सत्र न्यायाधिश साहेब यवतमाळ येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे एकुण ५ साक्षदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरून, सरकारी साक्षदाराच्या साक्षीमध्ये तफावत दिसुन आल्याने, साक्ष विद्यमान न्यायालयाने ग्राहय न धरता आरोपीची सदर प्रकरणातुन निर्दोष मुक्तता केली आहे.या प्रकरणात ॲड. युवराज कृष्णराव धांडे यांनी मांडली असुन, त्यांना अॅड. इम्रान देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
