के.बी.एच. विद्यालय पवननगर सिडको नाशिक येथे आजी – नात मेळावा

के.बी.एच. विद्यालय पवननगर सिडको नाशिक येथे महिलारत्न पुष्पाताई हिरे यांचा वाढदिवसा निमित्त आजी-नात मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला
दि.१७ जानेवारी २०२३

     

महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलीत के.बी.एच. विद्यालय पवननगर येथे महाराष्ट्र राज्याच्या माजी आरोग्य मंत्री व महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा महिला रत्न श्रीमती पुष्पाताई हिरे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी *”आजी-नात”* मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब पवार यांनी स्विकारले.
सदर मेळाव्यात आजी व नाती एकत्र आल्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.वैद्य साहेब यांनी आजीचे कुटुंबातील महत्त्व व स्थान विद्यार्थ्यांना समजावले तसेच आजी आणि नातीचे भावविश्व उलगडून सांगीतले.तसेच श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या शैक्षणिक,सामाजिक,औद्योगिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील योगदाना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री आप्पासाहेब पवार यांनी *आदरणीय श्रीमती पुष्पाताई हिरे* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले व आभार कविता सोनवणे यांनी मानले.