
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील महेश सोनेकर यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पतसंस्था र.न. 109 च्या पार पडलेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत मधूकरराव काठोळे सरांचे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर श्री मधूकरराव काठोळे हे अध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यांच्या ठरलेल्या कालावधी नुसार अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर काठोळे सरांनी आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दिनांक 21/2/2024 रोजी परत अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये राळेगाव पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले रावेरी निवासी श्री महेश सोनेकर अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.अध्यक्षपद राळेगाव तालुक्याला मिळाल्याने राळेगाव तालुक्यात आनंदी आनंद व्यक्त होत असताना दिसून येत आहे. महेश सोनेकर सर हे राळेगाव तालुक्याचे रहिवाशी असून अध्यक्ष असल्याने सर्वत्र आंनद होत आहे.
