अखंड हरिनाम सप्ताहाचा काला म्हणजे अभेदात्मक अवस्था होय__ह.भ.प. नामदेव महाराज काकडे


प्रतिनिधी::प्रवीण जोशी


ढाणकी शहरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली यावेळी सुद्धा महाराष्ट्रातील विविध भागातून कीर्तनकारांची मानदियाळी कीर्तनासाठी लाभली होती. मानव जन्माचे कल्याण हे संतांच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी न जाता आयुष्य जगले पाहिजे अशा विविध सामाजिक मुद्द्यावर कीर्तनकारांनी यावेळेस श्रोत्यांना मार्गदर्शन केले.

शेवटच्या काल्याच्या कीर्तनासाठी ह.भ.प. नामदेव महाराज काकडे लाभले होते ते पुढे म्हणाले काल्याचे एकूण तीन प्रकार असून दहीभाताचा काला, रामनामाचा काला, ब्रह्मज्ञानाचा काला, व त्याचे तीन रोग आहेत वात, कफ, पित्त, दुर्गंधी हे स्थूल देहाची रोग आहेत. हे नष्ट करण्यासाठी वैदिकशास्त्राचा आधार घेतल्यास दहीभातकाला खाऊन शरीर पुष्ट होते व त्यातून सुख मिळते. सूक्ष्मदेह व त्याचा रोग, काम, क्रोध, लोभ, मोह,दंभ वासना, इच्छा, व अहंकार असून ते रामनामाच्या काल्याने नाहीशी होते. तिसरा देह कारण त्याचा रोग अज्ञान आहे व त्याचा निवृत्तीचा उपाय म्हणून ब्रह्मज्ञानाचा काला सांगितला आहे. मानवी देहात हाच काला मिळाला पाहिजे, असे शास्त्रात ग्रंथात सांगितले आहे. या वृत्तीने कसलाच भेद राहत नाही. हा काला वैकुंठातही नाही. कारण यावरील सर्व लोकात दोष आहेत. ह भ प नामदेव महाराज काकडे यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले पुढे बोलताना म्हणाली की तो काला आम्ही कुठे खाणार तर निष्काम कर्म करून, फळाचा मदन करिता काला करणार. यासच वाळवंट म्हटले आहे. त्याचवेळी अभेद अवस्था मिळते व पुन्हा पुन्हा जन्माला येऊन हा आनंद लुटू असे ही यावेळी महाराज म्हणाले. यावेळी महाप्रसादाचाही कार्यक्रम होता सदभक्तांनी असलेल्या सेवेकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात परिसर प्रशस्त व परिसर ठेवण्याचा प्रयत्न केला.