
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शहरात काही दिवसापूर्वी बुलेट चोरी गेल्या होत्या या संदर्भात राळेगाव पोलीस स्टेशनला वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत समीर संतोषराव गोकुळवार रा. बहारे लेआउट राळेगाव यांची चोरीस गेलेली बुलेट मोटरसायकल क्रमांक एम.एच. ३४/ई.एस. ३२२२ किंमत १ लाख रुपये तसेच तूफेल जमेल शेख रा. नवीन वस्ती राळेगाव यांची चोरीस गेलेली बुलेट मोटरसायकल क्रमांक एम.एच. ४९/ए.क्यू. २५४६ किंमत १ लाख रुपये अशा पोस्ट राळेगाव शहरातील चोरीस गेलेल्या दोन्ही बुलेट मोटरसायकल वाहनाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस स्टेशन लोहारा यांनी दिलेल्या माहितीवरून यवतमाळ शहरातून दि. ७ ऑगस्ट रोजी निलेश श्रावण मुनेश्वर (३२) रा. सालोड ता. जि.यवतमाळ, आदीत्य प्रकाश राउत (२०) रा. यवतमाळ, गणेश विलास उले (१९) रा. शिरोली ता. घाटंजी यांना ताब्यात घेऊन रीतसर अटक करून त्यांच्याकडून दोन्ही मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी हे मोटर सायकलची हँडल लॉक नसतात त्यांना डायरेक्ट करून चोरी करून घेऊन जातात म्हणून राळेगाव शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी आपले मोटरसायकल हँडल लॉक करून सुरक्षित रित्या ठेवण्याबाबत सूचना राळेगाव पो.स्टे.च्या ठाणेदार श्रीमती शितल मालटे यांनी दिल्या आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शितल मालटे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. योगेश दांदे, पो.उप.नि. विशाल बोरकर, स.पो.नि. गोपाल वास्टर, पोलीस नाईक सुरज चिव्हाने, अविनाश चव्हाण यांनी केली आहे.
