1



वणी :- येथील तहसील कार्यालयावर आज ता. ११ रोजी दु. १ वाजता श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांनी स्वयंपूर्तीने एकत्रित येऊन आपली उपस्थिती दर्शवीत विविध मागण्यांसाठी जनआक्रोश महामोर्चा संपन्न केला. या मोर्चाने वणीकरांचे लक्ष चांगलेच वेधले.
तालुक्यातील विविध गावातून मोर्चेकरी वणी येथिल जत्रा मैदानात असलेल्या हनुमान मंदिरात सकाळी १० पासून जमायला लागले होते. दुपारी १२.३० वाजता मोर्चाने आपले प्रस्तान केले असता मोर्चा शहीद भगतसिंह चौकातून गांधी बाजार, खाती चौक, छ. शिवाजी महाराज चौक व तहसील कार्यल्यावर धडकला सदर मोर्चाला मार्गदर्शक म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे तर उपस्थित मान्यवर म्हणून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. धम्मावतीताई वासनिक , जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, मिलिंद पाटील , किशोर मुन, प्रा. आनंद वेले, उमेश पळवेकर, निशिकांत पाटील, रामदास पखाले, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून सरकारचा खरपूस समाचार घेतला यावेळी सूत्र संचलन किशोर मुन यांनी तर आभार राजू गोरे यांनी व्यक्त करून मोर्चाची सांगता केली व मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले या निवेदनात खालील मागण्यां करण्यात
आल्या अश्या की वयोवृद्ध, विधवा माता बघिणी व दिव्यांगणा मिळणारे तुटपुंजे १ हजार निराधार मासिक वेतन वाढवून ५ हजार रुपये करण्यात यावे, निराधार लाभार्त्यांचे वय मर्यादा ६५ वर्ष असून ती ६० वर्ष करण्यात यावी, निराधार पात्रतेसाठी २१ हजार रुपये असलेली वार्षिक उत्पनाची अट ७५ हजार रुपये करण्यात यावी, ५ एकर खालील सर्व शेतकऱ्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा ,दिव्यांग व्यक्तींसाठी निराधार योजनेकरिता १लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा करण्यात यावी, सर्व दिव्यांग नागरिकांना २ लाख रुपया पर्यंतचे व्यावसायिक कर्ज ८०% अनुदानावर विनाअट देण्यात यावे, निराधारांच्या मासिक वेतन नियमित देण्यात यावे, सर्व बेरोजगार सुशिक्षित युवक – युवतींना कायम स्वरूपी रोजगार मिळेपर्यंत १५ हजार रुपये मासिक भत्ता देण्यात यावा, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, पुरपीडित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी,
यावर्षी अतिवृष्टी झाल्याने सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ देण्यात यावा,जीवनावश्यक वस्तूवरील लावलेला जि.एस.टी. कर रद्द करावा व वाढती महागाई कमी करावी, सर्व निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या याकरिता इलेक्ट्रिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) बंद करून बॅलेट पेपरवर पार पाडाव्यात, शेतकरीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यावरील जीएसटी कर तात्काळ रद्द करावा,
१९९५ पासून राह्यलंत असलेल्या वणी नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे, घरकुल योजनेचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना मिळत नसून त्याची चौकशी करून सर्व सामान्य नागरिकांना त्याचा लाभ देण्यात यावा, मागील ५ वर्षातील नगर परिषदेतील सर्व विभागातील झालेल्या आर्थिक घोटाळ्याची तात्काळ चौकशी करावी, वणी शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तात्काळ येथील पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी नेमण्यात यावे. आदी मागण्यां करण्यात येत आहे याची तात्काळ आपल्या कडून दाखल घेण्यात यावी व मागण्यापूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, विरोधी पक्ष नेते, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना तहसीलदार वणी यांचे मार्फत पाठविण्यात आले.
