विदर्भ कोकण ग्रामीण बँकेवर धाडसी दरोडा,21 लाखाचे रुपयांची रोकड व सोने लंपास

संग्रहित

भद्रावती तालुक्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेवर धाडसी दरोडा टाकत अज्ञात दरोडेखोरांनी रोख रक्कम व सोने असा 21 लक्ष रुपयांचा मुद्देमाल पडविला सदर घटना दिनांक 18 च्या रात्री ला तालुक्यातील चंदनखेडा येथे घडली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांनी भेट दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती ते ठाणेदार गोपाल भारती यांनी या दरोड्याचा तपास लावण्यासाठी ठसे तपासणे ,श्वान पथक, फॉरेन्सिक , एलसीबी अधिकारी व कर्मचारी असे चार पथके गठीत केली असून ही सर्व पथके घटनेचा तपास लावण्यासाठी रात्रोला घटनास्थळाकडे रवाना झालेली आहे.
अज्ञात दरोडेखोरांनी मध्य रात्री नंतर बँकेचे कुलपे तोडून बँकेत प्रवेश केला व गॅस कटरच्या साह्याने बँकेची तिजोरी फोडली. या तिजोरीत असलेल्या आठ लाख रुपयाची रोकड व 13 लाख रुपये यांचे सोने असा मुद्देमाल लंपास केला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक सदंमा फुललेले यांनी भद्रावती पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार केली .पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार गोपाल भारती यांचे नेतृत्वात भद्रावती पोलीस या अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत आहे.