राळेगाव तालुक्यातील येवती येथील उमेश पोहदरे आणि सौ.पुनम पोहदरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान

सहसंपादक : रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील धानोरा विभागातील येवती येथील प्रगतिशील शेतकरी उमेश गोविंदराव पोहदरे हे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शेती करत असून ज्यामध्ये एकदाच बेड करून नंतर कित्येक वर्षे त्याच बेडवर,बेड न मोडता चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत असून या आगळ्यावेगळ्या पद्धतीने शेती करत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते व श्रम, पैसा आणि वेळ वाचते. या शेतीत ट्रॅक्टर,बैल व मजूर यापासून बरीच सवलत मिळते हे शेतकरी उमेश गोविंदराव पोहदरे या शेतकऱ्यांनी दाखवून दिले. ही शेती करत असताना शेणखत व रासायनिक खतांचा वापर खूप कमी लागते. हा शेतीतून केलेला प्रयोग हा इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा असून ही शेती पहायला खूप दुरून दुरून शेतकरी पहायला येतात.अशाप्रकारे या शेतीच्या प्रयोगाची दखल शासनाने घेऊन कृषी विभागाच्या भव्य राज्यस्तरीय सपत्नीक सन्मान सोहळ्याला उमेश गोविंदराव पोहदरे व त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ पुनम पोहदरे यांना सन्मानित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विद्यापीठ अहमदनगर येथे निमंत्रित करण्यात आले होते.त्याठिकाणी दिनांक 27/9/2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने शेती करून राळेगाव तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या पटलावर चढवणाऱ्या पोहदरे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.