
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
काही वर्षांपूर्वी तप्त उन्हाळा असताना वाटसरूंना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ठीक ठिकाणी अगदी धर्मार्थ मोफत सुविधा म्हणून पाणीपोई राहत असत. बऱ्याच शहरात व आजूबाजूच्या गाव खेड्यात त्या सुरू सुद्धा असतील पण वर्तमान परिस्थितीत मे महिन्यात नारायणराव किमान ४४ ते ४५ अंशावर आग ओकत असताना देखील अनेक गावखेड्यासाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या ढाणकी शहरात मात्र यावेळी सुद्धा उन्हाळ्यात सर्वसामान्यांसाठी एकही पाणीपोई स्थापन करण्यात आली नाही. त्यामुळे सर्वसामान्य अवाक झाली आहे.
निवडणूक असल्यास अगदी डोअर टू डोअर जाणाऱ्या पांढरपेशा नेत्यांचे काम होताच नागरिकांप्रती आपुलकीची जाणीव क्षीण होऊन ती मृतप्राय झाली?? असे प्रश्न भर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी भटकणाऱ्या व त्याची दशा पीडा बघून निर्माण होते. अनाधी काळापासून तप्त उन्हाळ्यात वाटसरूंना तृष्णा तृप्ती व्हावी म्हणून बनविण्यात आलेली मोफत ठिकाण म्हणजे पाणीपोई जे की आज पावतो अस्तित्वात आहे. मात्र ढाणकी शहर याला मुकल्याच प्रकर्षाने जाणवते. पाणीपोईची व्यवस्था काही वर्षांपूर्वी गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी किंवा देवालयाच्या ठिकाणी होत असत. त्या ठिकाणी मातीने घडविलेले गाडगे व पाणी संपल्यावर लगेचच विहिरीच्या पाण्याने ते तुडुंब भरून असत आणि दुसऱ्या दिवशी वाटसरूंना थंडगार पाण्याचा लाभ होत असत. एका सहकार क्षेत्रातील व माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या वित्तीय संस्थेने हे काम काही दिवस चालविले पण तेथे “आधी” कलेक्शन कमिशन दरवर्षीचे तेच ते माठ त्यावर अच्छादनासाठी लागणारी सुद्धा कापडे तेच पण बिल मात्र दरवर्षी काढावी लागत असल्यामुळे हे सर्व वैतागून बंद केल्याचं नाव न सांगण्याची अट घालून त्या वित्तीय संस्थांच्या शाखा प्रबंधकाने सांगितले. जंगल भागातील श्वापदे पाणी कमतरतेमुळे पाण्याच्या प्राप्तीसाठी मानववस्ती कडे चाल करत आहे. काही धर्मदाय संस्थांनी व समाज सेवकांनी एकत्रितपणे मानवनिर्मित चर जंगलात तयार करून पाणी जमिनीच्या पोटात न जिरता पॉलिथिन आच्छादन करून मुक्या प्राण्याचे पिण्याच्या पाण्याची गरज तहान भागवणे महत्त्वाचे आहे. वनविभाग जबाबदारी पासुन दूर जात आहे?? अशा प्रकारचे कार्य आपुलकीचे उत्तम दर्शन सत्कर्म ठरतील ते अंमलबजावणी झाल्यावरच. पिण्याचे पाणी पाजून किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे यात खूप मोठे कर्म पुण्य असते अशी एक श्रद्धा आहे. आजही अनेक संस्था हे काम करत असतात. ढाणकी शहरात अनेक पतसंस्था आहेत पण या अडचणीचे यांना काही घेणे देणे नाही. काही वर्षांपूर्वी पेक्षा पाणीपोईत सुद्धा आधुनिकता आली आहे जलशीतक (वॉटर कुलर) उपलब्ध करून वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकते. पण माठातील गार आणि आरोग्यास लाभदाई असलेल्या पानपोईची मागणी असते. जिथे विस्तीर्ण स्वरूपात झाडाची सावली असते अशा ठिकाणी पाणपोईची जागा हमखास ठरवील्या जाते. ज्याप्रमाणे सर्वसामान्यांसाठी पाण्याची व्यवस्था राहिलेली आहे तशीच व्यवस्था मुक्या अबोल प्राण्यांसाठी तत्कालीन काळात होती.
अतिशय सुंदर हाताने घडविलेले मोठे दगडाचे नांदाडात पाण्याची व्यवस्था असायची एखादा गर्भश्रीमंत शेतकरी आपल्या शेताच्या बाजूला अशी व्यवस्था करत असत ज्यात गुरे चरायला जाताना व येताना त्यातील पाणी पीत असत पण ते सध्या अल्प प्रमाणात दिसत असून याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. शिवाय काही पक्षीप्रेमी मातीचा माठ किंवा इतर वस्तू अर्धे-अधिक कापून तो शिंक्यासारखे मोठे वृक्ष बघून पक्षासाठी पिण्याची पाण्याची उपलब्ध करत असते. सूर्य हे आकाशातून आग बरसतो आहे. विविध उपलब्ध असलेल्या थंड पेयाच्या दुकानातून वीस रुपयाची पाण्याची बाटली मूल्य देऊन शरीराची होत असलेली दाह शमवत शरीराचे तापमान पाहिजे प्रमाणात स्थिर राहण्यासाठी क्षणाक्षणाला थंडगार जल प्राशन करून आपली कृष्णा तृप्ती करतोय. मात्र सर्वसामान्य आजही कुठेतरी पाणीपोई असेल असे म्हणत चमकणाऱ्या उन्हात फिरत असल्याचे दिसत आहे. हॉटेलवाले मालक काही जिन्नस खरेदी केल्याशिवाय पिण्यासाठी पाणी देत नाही व पाण्याची बाटली मूल्य देऊन खरेदी करायला रक्कम नाही केवढी ही अवघड परिस्थिती. उन्हाळ्याचा हा शेवटचा महिना असला तरी आजपावतो प्रशासन किंवा पांढरापेशा नेत्याची किंवा एखाद्या संघटनेल पाणीपोई चालू करण्यासाठी सदविवेकबुद्धी जागरूक झाली नसल्याच नागरिकांचे हाल बघून वाटत आहे. जुने बसस्थानक परिसरात कृषी उत्पन्न बाजार उपसमिती, नवीन बसस्थानक किंवा रहदारीच्या ठिकाणी नगरपंचायत प्रशासन गावातील नेते अशा दयावान व्यक्तींनी यावर्षीच्या अतिउष्ण उन्हाळ्यात पुढे होऊन वर्दळ असलेल्या ठिकाणी धर्मार्थ व निशुल्क पाणीपोई सुरू करायला पाहिजे होती अशी मागणी वाटसरू करतात.
