

प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर
नगर परिषद च्या गेट वर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना शहरातील हिलींग टच मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल वर का कारवाई केली नाही असे विचारून त्या कर्मचाऱ्यांना धक्का बुक्की करून जबरदस्तीने नगर परिषद ला कुलूप लावले व प्रशासकीय कामात अडथळा व पाहून घेईल अशी धमकी दिली.सोमवार ला नगर परिषद चे अधिकारी व कर्मचारी शासकीय कामकाज करीत होते दरम्यान काही मंडळी नगर परिषद च्या लोखंडी गेट जवळ येवून जोराजोराने आवाज करीत होते गेटवर दोन कर्मचारी होते तेव्हा त्यांना हिलींग टच हॉस्पीटल वर का कारवाई केली नाही? असे विचारत असताना कामात व्यस्त असणारे सर्व अधिकारी कर्मचारी गेट जवळ आले त्यांनी पोलीसांना फोन करून या प्रकाराची दिली पोलीस नगर परिषद ला पोहचले पोलीसांना पाहुन कोब्रा मंडळी पुन्हा जोर जोराने ओरडु लागली त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न नगर परिषद च्या अधिकारी यांनी केला मात्र ती मंडळी ऐकत नव्हते उलट प्रवेशव्दारा कुलूप लावन्याचा प्रयत्न करीत होते.
अधिकाऱ्यांनी कुलूप लावन्यास त्यांना मनाई केली असता कार्यालयातील गेट वर असलेले सुमित मेश्राम व राजेश सहारे यांना धक्का बुक्की केली कार्यालय तोडफोड करण्याची धमकी दिली व एक तास शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचार्यांना आत मध्ये डांबून जबरदस्तीने नगर परिषद ला कुलूप ठोकले.
भारतीय क्रांतीकारी संघटनाचे पदाधीकारी व त्यांचे सहकारी असल्याची माहिती आहे या संदर्भात पोलीसांनी सहा आरोपीवर भादवी ३५३ ३३२ ३४२ १४३ १४७ १४९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ साथ रोग कलम ३ महाराष्ट्र पुलीस अधिनीयम १३५ अन्वये गुन्हा नोंद केला मंगळवार ला सहा आरोपीना चिमूर न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने २४ मे पर्यत १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
