शालेय साहित्य व खेळांचे साहित्य देत सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप

 राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका येथे दिं ३० मार्च २०२४ शनिवारला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खेळांचे साहित्य भेट देवून निरोप समारंभ करण्यात आला होता.
निरोप समारंभाच्या सुरवातीला शिक्षणाची आराध्य दैवत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन इयत्ता सातवीच्या साक्षी फाले या विद्यार्थ्यीनीने केले.त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ भारती ताठे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले.त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मुलांना क्रिकेट बॅट व ऑफिस फाईल्स तर मुलींना बॅडमिंटन रॅकेट शटलसहित व ऑफिस फाईल्स देण्यात आले.विद्यार्थ्यांना हा नाविण्यपूर्ण कौतुक सोहळा बघून गहिवरून आले.मुलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शाळेतील शिकवणूकींची शिदोरी कायम स्मरणात ठेवून आचरण करण्याची ग्वाही दिली.चांगली माणसं व माणूसकी जपू असेही मनोगत व्यक्त करताना त्यांचे आनंदाश्रू तरळतांना आढळले सहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रिकेट बॅट व बॅडमिंटन रॅकेट शटलसहित देण्यात आले.इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांना पाण्याची बॉटल देण्यात आली.
या प्रसंगी शाळेतील परिसर अत्यंत सुशोभित करण्यात आला.फुगे व हारांची सजावट करण्यात आली.पाटाभोवती रांगोळी काढून विद्यार्थ्यांना मानाचे स्थान देण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ भारती ताठे यांनी स्वतः सर्व खर्च केला.विद्यार्थी हे माझे दैवत आहे याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली.पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन सोनल नासरे, प्रास्ताविक मंगला आगरकर तर आभार प्रदर्शन रेखा कोवे यांनी केले.
निरोप समारंभ आगळावेगळा व कायम स्मरणात राहील यासाठी शाळेतील शिक्षिका मंगला आगरकर, रेखा कोवे, अर्चना सुरजुसे व सोनल नासरे यांनी अतिशय स्तुत्य असे कार्यक्रमाचे नियोजन केले. शाळेतील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या मंदाबाई तातेवार यांनी अतिशय मेहनत घेऊन सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता व आईस्क्रीम वाटप केले.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून कार्यक्रम अतिशय अप्रतिम झाला याची जाणीव झाली. पालकांनाही खूप आनंद झाला
.