यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा मनिष पाटील आरूढ

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या राजीनाम्यानंतर अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने नविन अध्यक्षाची निवड प्रक्रिया रखडली.होती.या निमित्ताने नविन अध्यक्ष कोण होईल या विषयावर अनेक पक्षातील राजकीय नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुद्धा होत होती.अशातच मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नविन अध्यक्ष निवडीची तारीख 25/9/2023 असल्याचे जाहीर झाल्यानंतर मात्र हालचाली सुरू झाल्या.यामध्ये अनेक नावे अध्यक्षपदासाठी दावेदार असल्याचे बोलले जात होते. अशा प्रकारे चर्चेतच 25 तारीख उजाडली.तोपर्यंत मात्र आपापल्या परीने सर्व प्रयत्न केले गेले.आणि 25 तारखेला महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काॅग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने मनिष उत्तमराव पाटील तर विरोधी गटाकडून राजूदास जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.त्या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मनिष पाटील यांना 15 मते तर राजूदास जाधव यांना 6 मतं पडल्याने मनिष पाटील जवळपास 9 मताने विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून पेढे वाटून आनंद साजरा केला. ही निवडणूक म्हणजे दोन्ही गटाकडून अस्थित्वाची लढाई समजल्या जात होती.या निवडणूकीवरून निश्चितच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सहकार्य होणार असून अध्यक्ष हे दुसऱ्यांदा पदावर विराजमान झाल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले असून सर्वत्र नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राळेगाव तालुक्यातून सुद्धा सर्वत्र अभिनंदन केले जात असून पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीसाठी महाविकास आघाडीसाठी यशस्वी विजयाचे संकेत असल्याची चर्चा सुरू आहे.