
राळेगाव तालुक्यातील रहिवासी गजानन मधुकरराव कुंभारे वय 39 वर्ष रा.राळेगाव यांच्या शेतातील टिन शेड मधील सात कोंबड्या व पराटी उपटण्याचे दोन चिमटे व एक कुऱ्हाड कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याच्या फिर्यादीवरून पो स्टे राळेगाव येथे अप क्र.113/2024 कलम 461,380 भांदवी प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गून्हातील अज्ञात आरोपींचा शोध घेतला असता आरोपी संतोष रतिराम अंड्रसकर वय 42 वर्ष, मनोज रतिराम अंड्रसकर वय 38 वर्ष दोन्ही रा.राळेगाव यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हाची कबुली दिल्याने त्यांच्याकडून सदर गुन्हातील चोरी गेलेला मुद्देमाल सात कोंबड्या किंमत 4000/रू, दोन लोखंडी पराटी चिमटे किँमत अंदाजे 2000/रू, एक कुऱ्हाड किँमत अंदाजे 300/रू असा ऐकून 6300/रू चा सदर गुन्हातील चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच त्यांच्याकडे दोन सिलेंडर किँमत 8000/ रू, मिळुन आल्याने सदर सिलेंडर बाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवची उत्तरे देत असल्याने सदरचे सिलेंडर जप्त करण्यात आले व वरील आरोपी यांना ताब्यांत घेण्यात आले असून पुढील तपास पो हवा गोपाल वास्टर,विशाल कोवे,सूरज चिव्हाणे करत आहे.
