
प्रदेशाध्यक्ष आमदार मिलिंद कांबळे यांनी केली नियुक्ती
प्रमोद जुमडे/हिंगणघाट
हिंगणघाट:- शरद पवार पक्षाच्या वाहतूक विभागाच्या वर्धा जिल्हा अध्यक्ष पदी शेखर जाधव , जिल्हा उपाध्यक्ष पदी अन्सार मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली.मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार मिलिंद कांबळे यांच्या हस्ते हि नियुक्ती करण्यात आली.
शेखर जाधव हे गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असून वाहतूक क्षेत्रात त्यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या या नियुक्तीने वाहतूक विभागाचे संघटन शहर व ग्रामीण भागात मजबूत होईल.
नवनियुक्त शेखर जाधव व अन्सार मिर्झा यांनी शरदचंद्र पवार यांच्यावर श्रद्धा ठेवत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार मिलिंद कांबळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
