
सहसंपादक: रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील शेतकरी शेर अली लालाणी यांच्या शेतात अवकाळी पावसामुळे संत्रा व मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही संत्र चक्क गळून खाली पडले मात्र तालुक्यात एवढा मोठा अवकाळी पाऊस झाल्याने त्यांच्या शेतात राळेगाव कृषी विभागाचा एकही अधिकारी तसेच कर्मचारी यांनी भेट सुद्धा दिली नाही हि लाजीरवाणी बाब आहे. कृषी विभाग फक्त कागदी घोडे वापरत आहे शेतकरी शेर अली लालाणी यांनी माझ्या शेतात येऊन कृषी विभागाने पाहनी करून मला योग्य न्याय द्यावा अशी शेतकरी शेर अली बापू लालाणी यांनी आपली व्यथा आमच्या प्रतिनिधी शी बोलून दाखवली.
