राळेगाव तालुक्यातील सोनामाता हायस्कूल चहांद येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील सोनामाता हायस्कूल चहांद येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. मुख्याध्यापक धोबे सर तसेच प्रमुखअतिथी म्हणून मा. चिव्हांणे सर उपस्थिती होते. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सावित्री बाई फुले मानवंदना वाहीली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतुन कु नेहा अनिल भोयर वर्ग ७वा हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच कु पुर्वी देऊळकर सिमरन राखुंडे प्रतिक्षा वाघमारे सानिका झोटिंग दिव्या मेश्राम निशा सातघरे या विद्यार्थ्यांनी नी मनोगत व्यक्त केले. तसेच सावित्रीबाई फुलेच्या जीवनकार्य विषयी सविस्तर असे मार्गदर्शन कांबळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षरा महाजन हिने केले तर आभार प्रदर्शन सागर कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सावंत सर दांडेकर सर शिवणकर सर शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी दादा डहाळकर राजकुमार झोटिंग देवानंद सोनोने प्रथमेश राऊत उपस्थित होते.