
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील एकमेव असलेल्या शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा किन्ही जवादे येथील ३६ विद्यार्थीनी माध्यमिक शालांत परीक्षा दिली सदर परीक्षेचा निकाल दि २७ मे २०२४ सोमवार जाहिर झाला व ३६ विध्यार्थी पैकी ३५ विध्यार्थी पास झाले आहे आणि शाळेचा निकाल ९७.२२ टक्के इतका लागला आहे या परीक्षेत कु आरती रमेश फुटकी ही विद्यार्थिनी शाळेतुन ८२% मिळवुन प्रथम आली आहे. कु प्रांजली पंजाब कुमरे ला ७४.४०% मिळवून द्वितीय क्रमांक आला.कु शिवाणी शालीक टेकाम ७२.२०% मिळवून तृतीय क्रमांक आला सर्व यश प्राप्त विद्यार्थ्याचे, संदीप आत्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका वानखेडे मॅडम, शंकर पंधरे तालुकाध्यक्ष ट्रायबल फोरम राळेगाव तथा सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, सुनील मेश्राम माजी अध्यक्ष, अधिक्षक थेटे सर, शिक्षक, रजमलवार सर कडु सर, अधिक्षीका इंगळे मॅडम, शिक्षक दुधकोहळे, शिक्षिका, गेडाम मॅडम, जुमनाके मॅडम, उईके मॅडम, गजबे मॅडम तथा सर्व कर्मचारी यांनी विध्यार्थीचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
