
प्रतीनिधी प्रवीण जोशी ,ढाणकी
ढाणकी येथील हनुमान दुर्गा उत्सव मंडळाने रामायण कथेचे आयोजन केले होते या निमित्ताने दिनांक तीन तारखेला या कथेची सांगता करण्यात आली. यावेळेस बोलताना सुरेश महाराज म्हणाले आजकाल अहंपणाची बाब सगळीकडेच फोफावत आहे कोणाला पैशाचा गर्व तर कोणास कर्तुत्वाचा पण स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले आहे की उद्या आपले मरण आहे ही बाब लक्षात ठेवली तर जीवनाचे मर्म व सारासार जीवन काय असते हे कळेल.
आपला स्वभाव हा आपल्या चेहऱ्यापेक्षा सुंदर असायला हवा नटलेला सुंदर चेहरा काही काळ सुंदर दिसून येईल मात्र सुंदर स्वभाव हा जीवनभर सुंदरच राहील अशा सौंदर्याने नटलेला सुंदर चेहरा अंतर्गत गुनातून सजलेला सुंदर स्वभाव यावर यावर व्यक्तीचे व्यक्तिमत्व अवलंबून असते असे सुरेश महाराज हनुमान दुर्गोत्सव मंडळाच्या सभा मंडपात व श्रोत्यांना सांगत होते पुढे ते म्हणाले नवरात्र महोत्सव आदिशक्ती आदिमाया घटस्थापने पासून विराजित झाली आहे. तशीच आदिशक्ती आपल्या देहात प्रस्थापित आहे या शक्तीला रामायण ग्रंथातून आचरणाची तर महाभारत ग्रंथातून उपदेश देताना ज्ञानामृत जीवनाला प्रेरणा देणारी चेतना प्राप्त करायची आहे या शक्तीला शरीराच्या संयोगाने सत्याची साधकता मिळवायची आहे या शरीराद्वारे सत्याची साधना करा व याची किंवा संसाराची कार्य करा हे सगळे आपल्याच हातात आहे त्यानुसार आपले शक्ती प्रदान करणारे मंत्र जे आपल्याला प्रेरणा देतात असे अरिहंत मंत्र अंतर्गत शत्रूचा नाश करून परिस्थिती दूर करून परमात्म्याशी संलग्न करणारा त्याला वंदन करणारा हा मंत्र .दूध दही मिसळून निघणाऱ्या सातवीकता नमो सिद्धांन, सिद्ध पुरुषाला वंदन करणारा सातवी कता जशी लोण्यातून तुपातून परिवर्तन होणारा जो आहे नमो वासुदेवाय अर्थात योग्य त्या शासनात राहून शिस्तबद्ध आचरण करण्यात उपयुक्त करणारा हा मंत्र वंदन करण्यायोग्य आहे तर इतरांना सदर उपदेश देऊन लोकांचे कल्याण व्हावे सदभावनेचा हा मंत्र करणे आहे. त्याचप्रमाणे अंबाबाईचे भक्त आहेत अशाप्रती आत्महत साधणाऱ्यांना वंदना असावे अशा या जनहितार्थ मंगल भावनेने स्वतःसह इतरांचे हित अर्थात सकारात्मक शक्तीची देवता प्रस्थापित करून श्रीपाला प्रमाणे आपले चारित्र्य सुदृढ व लोकहित राहील असा बहुमोल उपदेश सुरेश महाराज यांनी रामायण कथेच्या सांगते वेळी दिला या कार्यक्रमाला दिनकरराव जन्नावार, मयुरेश जन्नावार, यांचे विशेष सहकार्य लाभले.
