खासदार भावना गवळी यांच्या प्रयत्नाने मिळणार कर्जमुक्ती योजनेतील वंचित शेतकऱ्यांना लाभ!

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव


राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना 2017 घोषित केली होती व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 घोषित केली होती. या दोन्ही योजनातील वंचित शेतकऱ्यांसाठी खासदार भावनाताई गवळी यांनी सरकारकडे पाठपुरवठा केल्याने आता शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
वित्तमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी राज्यांचा अर्थसंकल्प मांडत असताना ही माहिती दिली असता शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून एकूण 23 ग्रीन याद्या तयार झाल्या होत्या. यातून 1 लाख 28 हजार 464 शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित होते. कर्जमुक्तीचा लाभ मिळावा याकरिता शेतकऱ्यांनी जिल्हा स्तरावर पाठपुरवठा केला. मात्र एस आले नाही. नीरज जाधव यांच्यासह अनेक वंचित शेतकऱ्यांनी खासदार भावनाताई गवळी यांनापाठ पुरवठा केला, त्यानंतर भावनाताईंनी डी डी आर सोबत बैठक घेऊन माहिती घेतली. शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन वंचित शेतकऱ्यांची माहिती दिली.
याबाबत कागदपत्रासह सतत पाठपुरवठा केल्यामुळे आज कर्जमुक्ती पासून वंचित शेतकऱ्यांना राज्य सरकारने निधीची तरतूद केल्यांची माहिती फडवणीस यांनी अर्थसंकल्प मांडताना दिली.
त्यामुळे शेतकऱ्यांनी खासदार भावनाताई गवळी यांचे आभार मानले आहे.