गुलाबी बोंड आळी व मर रोग बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

                              

यावर्षी झालेल्या अति पाऊसामुळे यावर्षी गुलाबी बोन्ड आळी व मर रोगा चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने कृषी विभागाचे मार्फत श्री अमोल जोशी तालुका कृषी अधिकारी राळेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचे कृषी सहाययक श्री विशाल मुळाटे यांनी आज दिनांक 22/09/2022 रोजा मौजा वरंध येथे कापूस पिकातील गुलाबी बोन्ड आळी नियोजन करण्यासाठी म्हणून ऐकरी 8 फेरोमोन ट्रॅप लावून निरीक्षणे घ्यावी आणि आवश्यकता असेल तरच कीटकनाशकांचा वापर करावा व तसेच कापूस पिकावरील आकस्मिक मर रोग उपाय योजने साठी coc (कॉपर आक्सीक्लोराईड) 25 मी ली +युरिया 200 ग्राम +पालाश 100 ग्राम प्रति 10 ली पाणी याची झाडाच्या बुंद्यात आवळणी करावी या बद्दल मार्गदर्शन केले तसेच कीटकनाशके फवारणी करतना काळजी घेण्या बाबत मार्गदर्शन केले व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली या प्रसंगी गावातीळ प्रगतशील शेतकरी वर्ग तसेच तलाठी श्री तुमराम, पोलीस पाटील श्री कळसकर उपस्थित होते.