
21 व 27 जुलै रोजी राळेगाव शहरात झालेल्या अतिवृष्टीने नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला ज्यामुळे नाल्याकाठच्या शेतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई मिळावी व नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण करावे असे निवेदन राळेगाव ग्राविकाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना देण्यात आले .राळेगाव येथे 21 व 27 जुलै रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने वाऱ्हा व आष्टा रोडवरील नाल्याला पूर येऊन जवळपास साडेचारशे हेक्टर शेतावरील पिके खरडून गेली ज्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मागील वर्षी पावसाळ्यात अशाच पद्धतीचे नुकसान झाले होते तेव्हा उपविभागीय अधिकारी राळेगाव व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते पण त्याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही व नाल्याचे कुठलेही काम झाले नाही उपविभागीय अधिकारी राळेगाव यांनी तेव्हा जलयुक्त शिवार मधून नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण करूअसे आश्वासन दिले होते गेल्या वर्षी जर नाल्याचे काम झाले असते तर यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले नसते त्यामुळे नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण करण्यात यावे निदान पुढील वर्षी तरी पुरामुळे शेताचे नुकसान होणार नाही तसेच 21 व 27 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी कृष्णराव राऊळकर विनोद नरड गजानन पाल व शेतकरी बंडू लोहकरे निलेश फाळके श्याम राडे उपस्थित होते.
