
सहसंपादक : रामभाऊ भोयर
*
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त कलावंत साहित्यिक कलामंच आणि तपोभूमी गाडगेबाबा कमेटी कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिन दिवसिय ” पुण्यतिथी सोहळा ” कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते* या समारोपिय कार्यक्रम चे अध्यक्ष ह भ प दिगांबर गाडगे कीर्तनकार हे होते तर प्रमुख अतिथी मार्गदर्शक मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे मंचावर उपस्थित होते पुण्यतिथी निमित्त अनेक उपक्रम राबविण्यासाठी महिला मंडळ दिंडी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते, रांगोळी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते, भजन, कीर्तन, प्रवचन या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यासाठी विविध गावांतील सांप्रदायिक वारकरी भजन मंडळ आणि गुरुदेव सेवा मंडळ यांनी सहभागी झाले होते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समारोपप्रसंगी बोलताना मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी सांगितले की , समाजात विकृत विचार, आणि व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ह्या बाबी थांबविण्यासाठी सांप्रदायिक विचार, लोक प्रबोधन, आणि महिलांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे आणि असे कार्यक्रम गावा गावात झाले पाहिजे असे स्पष्ट मत मा. मधुसूदन कोवे गुरुजी यांनी तपोभूमी श्रीक्षेत्र गाडगेबाबा विचार मंच येथे मांडले कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांनी आप आपली प्रतिक्रिया दिली दिंडी स्पर्धांचे परीक्षक म्हणून ह भ प सुनील महाराज आळंदीकर आणि ह भ प गाडेकर महाराज बाभुळगावकर होते आणि मंचावर उपस्थित मा सौ शितल लाड प्रबोधनकार, मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच, मा शेषराव महाराज मोकाशी मा वासुदेव दाभेकर आणि ह भ प आदे महाराज कामटवाडा मा. कृष्णा जी भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मा अशोकराव उमरतकर यांनी मानले या कार्यक्रमात सहभागी सर्व ग्रामवासी सांप्रदायिक विचारांची महिला आणि पुरुष मंडळी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती अशा आनंददायी सोहळ्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी ची सांगता महाप्रसाद देवुन समाप्ती करतात आली होती.
