
भद्रावती तालुक्यातील माजरी गावातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे परंतु याकडे प्रशासनाचे लक्ष नाही .एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली त्यासाठी जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिक करत आहे. या भागातील नाल्या तुडुंब भरलेल्या असून त्याची देखील साफसफाई करण्याची गरज आहे. .परंतु असे. होताना दिसत नाही.नाली साफ न झाल्यामुळे डासांची संख्या खूप वाढत आहे आणि डासांमुळे लोकांना जास्त त्रास होत आहे आणि लहान मुलांनाही डेंग्यू आणि मलेरिया होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने हे लवकरात लवकर काढून टाकावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
