
प्रतिनीधी;;प्रवीण जोशी
यवतमाळ
महागांव : आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियान निमित्त १५ आॅगस्ट मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टीच्यावतीने उमरखेड /महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते तालुक्यातील १७ माजी सैनिकाचे आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र आखरे हे होते. याप्रसंगी उपस्थिती उपस्थितांकडून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. रामदास वंजारे, जगदेव हिंगमिरे, संजय राठोड, देवराव घड्याळे, दत्तराव टेकाळे, साहेबराव पाईकराव, लक्ष्मणराव कानडे, संतोष वानखेडे, शेषेराव हुलगंडे, संजय माहुलकर, तुकाराम गावंडे, शशिकला मोतीराम कलाने, प्रयागबाई हिंगाडे यांचा व माजी सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सचिव विलास शेबे, तालुका सरचिटणीस योगेश वाजपेयी, संजय चिंतामणी, अंबादास भीमटे, रघुनाथ पाटिल नरवाडे, सुरेश खंदारे, बाळासाहेब पांडे ,हरिभाऊ खंदारे, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
