15ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि श्रावण मास निमीत्त जिल्हा यवतमाळच्या श्री.मैढ़ क्षत्राणी स्वर्णकार समाज महिला मंड़ल यांची सहल राणी अमरावतीला…..

सहसंपादक : रामभाऊ भोयर—–—–

स्वातंत्र्य दिना निमित्त यवतमाळ जिल्हाच्या श्री.मैढ़ क्षत्राणी स्वर्णकार समाज महिला मंडल यांच्या श्रावण मास निमित्त विदर्भातील तिर्थक्षेत्र राणीअमरावती येथे महिलांची सहल आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या फोटो चे तसेच भारत मातेच्या वेशभूषेत आलेली कु.दिशा जालु हिचेही पुजन करुन नंतर स्वर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री.अजमीढ़जी महाराज यांची आरती करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर वरीष्ठ महिलां,महिला कार्यकारिणी मंड़ल तसेच जिल्ह्यातील आलेल्या महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.जिल्हा यवतमाळच्या अध्यक्षा सौ.आशाताई ढ़ल्ला/वर्मा यांनी आलेल्या महिलांचे संबोधन करत सांगितले कि येणाऱ्या काळात जिल्ह्यात विविध तालुक्यातील महिलांना संपर्क करुन प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.माजी अध्यक्षा सौ.विद्याताई धुप्पड़/वर्मा यांनी महिला मंड़ळच्या अध्यक्षाचे कौतुक करत स्वतःच्या वैयक्तीक खर्चातुन अध्यक्षा आणि कार्यकारिणी महिला मंड़ळाचे स्वागत केले.पांढ़रकवड्याहुन आलेल्या महिला मंडळाच्या सौ.हेमलताताई सुनालिया यांनी ही आपले विचार मांड़ले आणि यवतमाळच्या महिलांना भरभरून शुभेच्छा दिल्या.बाभुळगावच्या कु.आकांक्षाताई जवड़ा यांनी आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले हे थोडक्यात सांगितले.तसेच सामाजिक जिल्हा यवतमाळच्या महाराष्ट्र प्रांत E717संघटनेच्या एकमेव महिला ट्रस्टी सौ.संतोषीताई सहदेव /वर्मा यांनी महिलांना विविध योजनांची माहिती दिली.महिलांनी जास्त संख्येने समाजाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आव्हान केले त्यासोबत विश्वकर्मा योजनेची माहिती दिली.15ऑगस्टच्या औचित्यांनी आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या श्रावण मास निमित्त आणि तीर्थक्षेत्र राणी अमरावती चे आई कमळजा मातेचे ठिकाण,गौमुख जिल्ह्यातील महिलांना चांगलेच रमणिय वाटले.
वृक्षारोपण भारत माता कु.दिशाताई जालु,वृक्षारोपण जेष्ठ महिलां श्रीमती सुशीलाताई बेवाळ,सौ.पुष्पाताई सहदेव/वर्मा,सौ.शारदा आर्या/वर्मा,सौ.मंगला कड़ेल,सौ.हेमाताई कडेल,सौ.मायच्छ,श्रीमती रुक्मिणी सहदेव, वृक्षारोपण कार्यकारिणी महिला मंडळ सौ.आशाजी ढ़ल्ला,सौ.दुर्गाताई कड़ेल,सौ.मनिषा कड़ेल,सौ.अनामिका बेवाळ,सौ.शितल कड़ेल, वृक्षारोपण जिल्ह्यातील इतर महिलां सौ.प्रिया नारनोली,सौ.गौरी सहदेव,सौ.शशी कड़ेल,सौ.वर्षाताई,सौ.मायच्छ,सौ. संगिता ढ़ल्ला,सौ.मीना जवड़ा,सौ.खजवानिया,सौ.अरुणा कड़ेल,सौ.रानु धुप्पड़,श्रीमती मधु कड़ेल,सौ.रोडा,सौ.जालु,वृक्षारोपण सामाजिक कार्यकर्ता सौ.संतोषी सहदेव,सौ.ललिता जवड़ा
समस्त जिल्ह्यातील महिलांनी एक पेड़ भारत मां के नाम हा उपक्रम राबविला.
या कार्यक्रमाचे संचलन सौ.शितलताई कड़ेल/वर्मा,आभार प्रदर्शन सौ.अनामिका बेवाळ यांनी केले.
मार्गदर्शन श्रीमती सुशीलाताई बेवाळ,श्रीमती उमाताई ढ़ल्ला,सौ.ममताताई कड़ेल,सौ.ललिता ताई जवड़ा,या कार्यक्रमात फोटो ग्राफी कु.गौरी सहदेव,कु.ईषा कड़ेल.या कार्यक्रमाच्या स्पर्धेच्या विजेता सौ.अनुराधा सहदेव,सौ.सोनल खजवानिया,सृष्टि वर्मा,कात्यायनी वर्मा या स्पर्धेचे बक्षीसे महिला कार्यकारिणी मंडळांनी आप आपल्या स्वखर्चाने केले आहे.या सामाजिक कार्यक्रमात मुर्ती लहान पण किर्ती महान अशी कौतुकास्पद कामगिरी 10वर्षाची चिमुकली नी केली आहे कु.कात्यायनी कड़ेल …ह्या मुलीने आपल्या सक्रिय आणि कुशल बुध्दिमत्तेचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले आहे.